shiv sena 16 mla disqualification hearing start today Eknath Shinde Uddhav Thackeray Maharashtra Politics  Saam Tv
मुंबई/पुणे

Shiv Sena News: आमदार अपात्र प्रकरणाच्या कारवाईला वेग; विधानसभा अध्यक्ष CM शिंदे आणि उद्धव ठाकरेंना नोटीस धाडणार

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्र प्रकरणाच्या कारवाईला वेग दिला आहे.

Satish Daud

Shiv Sena MLA Disqualification Case Latest Updates

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्र प्रकरणाच्या कारवाईला वेग दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विधिमंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  आणि उद्धव ठाकरे यांना आमदार अपात्रतेबाबत आपली बाजू मांडावी लागणार आहे. दरम्यान, आमदार अपात्र याचिकांवरील सुनावणीला विलंब होत असल्याची तक्रार ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली होती.

विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा काढत असल्याचा आरोप करत, ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने यावर सुनावणी घेत राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

अजित पवार मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लान बी तयार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लान बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाल्यास अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 

याशिवाय भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील नाव चर्चेत आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाली तरी, भाजपकडे विधानसभेत १०५ आमदार, अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटाचे ४० आमदार मिळून मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमताची अडचण नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT