Ajit Pawar  saam tv
मुंबई/पुणे

Political News: अजित पवार मुख्यमंत्री होणार; 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली वाढणार; असिम सरोदेंचा मोठा दावा

Asim Sarode Tweet: सर्व चर्चांदरम्यान वकील असिम सरोदे यांच्या ट्वीटची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Latest Political News: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सध्या एकाचवेळी सुरु आहेत. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्याच्या कारणात अनेक मोठे बदल होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

सर्व चर्चांदरम्यान वकील असिम सरोदे यांच्या ट्वीटची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 11 मे अजित पवार येत्या काळात भाजपसोबत जातील आणि मुख्यमंत्री बनतील असा दावा, असिम सरोदे यांनी केला आहे.  (Latest Marathi News)

11 मे नंतर राजकीय घडामोडींना वेग येणार

असिम सरोदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे आधी नक्की होतील. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की आहे.' (Political News)

राज्यात नवीन राजकीय जुळवा जुळव सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय जबाबदारी सुप्रिया सुळे तर राज्यातली जबाबदारी अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे, असं मत असिम सरोदे यांनी मांडलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या निकालाच्या आधारे राज्यातील राजकारण बदलेल. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेचे काही आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकार पडू शकतं. अशावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याच संधी आहे.

शिवसेनेचे आमदार अपात्र झाले तर...

अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शरद पवार यांची अडचण होणार म्हणून ते बाजूला गेले आहेत. शिवसेनेचे आमदार अपात्र झाले तर अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल. ते महाविकास आघाडीसोबत किंवा भाजप सोबत जाऊन सुद्धा सरकार स्थापन करू शकतात, असा दावा असिम सरोदे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT