sameer wankhede transfer News Latest Update  SAAM TV
मुंबई/पुणे

Sameer Wankhede Expressed Fear: अतीक अहमदसारखा माझ्यावर हल्ला होऊ शकतो, समीर वानखेडेंनी व्यक्त केली भीती

Mumbai Police: समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

Mumbai News: आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Case) आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एकीकडे समीर वानखेडे यांना याप्रकरणात मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) दिलासा दिला असला तरी दुसरीकडे त्यांना त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती वाटत आहे. समीर वानखेडे यांनी गँगस्टर आतिक अहमदसारखी माझी परिस्थिती होईल असा दावा केला आहे. यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

समीर वानखेडेंनी दावा केला आहे की, 'अतीक अहमदसारखा माझ्यावर देखील हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला सुरक्षा देण्यात यावी.' हल्ला होण्याची भीती व्यक्त करत समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. प्रयागराजमध्ये कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची पत्रकाराच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजच्या बाहेर 15 एप्रिलला ही घटना घडली होती.

समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन दाखल केली होती. याप्रकरणी सध्या मुंबई हायकोर्टात सुनावणी देखील सुरु आहे. हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 24 मेपर्यंत अटक न करण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहेत. तसंच समीर वानखेडे यांना 24 मे पर्यंत कोर्टाचे संरक्षण मिळणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे समीर वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान ऑगस्ट महिन्यामध्ये समीर वानखेडे यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली होती. समीर वानखेडे यांच्या ट्विटरवर धमकीचा मेसेज आला आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच समीर वानखेडे यांना धमकीचे ट्विट आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

SCROLL FOR NEXT