'राज्य सरकारला प्रोटोकॉल कळतो, सुक्ष्म मंत्री असल्याने नाव सुक्ष्म'; अरविंद सावंताचा राणेंना टोला SaamTV
मुंबई/पुणे

'राज्य सरकारला प्रोटोकॉल कळतो, सुक्ष्म मंत्री असल्याने नाव सुक्ष्म'; अरविंद सावंताचा राणेंना टोला

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या पासून राज्य बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : सिंधुदुर्ग Sindhudurg मध्ये उद्या होणाऱ्या चिपी विमानतळाच्या Chipi Airport उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझं नावं लहान का ? राजकारणात प्रोटोकॉल Protocol असतो, असा सवाल राणेंनी आज त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये Press conference उपस्थित केला होता याच मुद्द्यावरुन पत्रकारांनी पत्रकारांनी सावंत यांना प्रश्न विचारला असता 'राज्य सरकारला प्रोटोकॉल कळतो, तुम्ही सूक्ष्म मंत्री असल्याने नाव सुक्ष्म केलं आहे.' असा टोला शिवसेनेचे उपनेते खासदार अरविंद सावंत MP Arvind Sawant यांनी नारायण राणेंना टोला लगवाला आहे. (Arvind Sawant's criticism of Narayan Rane)

हे देखील पहा -

तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोलवू नका म्हणत होता आम्ही लहान का असेना नावं टाकलं याला मनाचा मोठपणा म्हणतात, शिवाय केवढं का असेना नावं आहे याला महत्व आहे असही सांवत म्हणाले. तसंच विमानतळाचं उद्घाटन आहेना "मग शुभ बोल... रे... पुढचं मी म्हणणार नाही..." अशी टीका सावंत यांनी राणेंवरती केली.

ते पुढे म्हणाले लखिमपुर Lakhimpur मध्ये घडलेली घटना इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे. खाजगी उद्योगांना पंजाब हरियाणात गोदाम टाकण्याची परवानगी मिळाली तेव्हा शेतकरी बिथरला या कायद्याने कामगारांना उध्वस्त केलं. शेतकऱ्याला चिरडल बेछूट खाजगीकरण Privatization सुरू आहे. कायद्याने दिलेलं त्याची टाळलं जातं आहे. तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने 11 तारखेला महाराष्ट्र बंद पुकारला आहे सहभागी होणार असून शिवसेनेची भारतीय कामगार सेना सहभागी होणार असल्याचही त्यांनी जाहीरं केलं.

अजित पवार Ajit Pawar अनिल परब यांच्या संबंधित घडलेल्या घटना महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी घडवत आहेत. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या पासून राज्य बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही सावंत यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT