Arrest Raj Thackeray and send him to jail: Demand of SP MLA Abu Azmi Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरेंची लायकी नाही, त्यांना बेड्या ठोकून तुरुंगात टाका : अबू आझमी

Abu Azmi On Raj Thackeray: जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: मशीदींवरील भोंग्याच्या मुद्दयावरून सपाचे आमदार अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. राज ठाकरेंना (Raj Thackeray) अटक करुन तुरुंगात टाका अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी (Abu Azmi) केली आहे. आमदार अबू आझमी यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली, यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे. (Arrest Raj Thackeray and send him to jail: Demand of SP MLA Abu Azmi)

हे देखील पहा -

अबू आझमी म्हणाले की, राज ठाकरेंसारखे लोक ज्यांंची काही लायकी नाही, ज्यांच्याकडे सीट नाही असे लोक आपली मनमानी करतात. मशीदींना परवानगी मिळाली आहे. या देशाच्या कायद्यानुसार हिंदु बांधव मंदिरात पूजा करु शकतात, मुस्लिम बांधव नमाज पठण करु शकतात असा कायदा देशात असताना राज ठाकरे काहीही बोलतात. त्यामुळे राज ठाकरेंसारख्या लोकांच्या हातात बेड्या ठोकून त्यांना जेलमध्ये टाकावे असं अबू आझमी म्हणाले आहेत.

मशिदीवरील भोंग्याबाबत काय म्हणाले होते राज ठाकरे?

२ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT