MNS Raj Thackeray News
MNS Raj Thackeray News Saam TV
मुंबई/पुणे

मनसेकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणखी एक पत्र; पोलिसांबाबत केली मोठी मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पुन्हा एक पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे मनसेने महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) दिवाळीचा बोनस देऊन त्यांची दिवाळी (Diwali) गोड करण्याची विनंती या पत्राद्वारे केली आहे.

मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी हे पत्र लिहलं आहे. त्यांच्या पत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे - विषय : महाराष्ट्र पोलिस बांधवांना दिवाळी बोनस मिळणेबाबत या विषयास अनुसरुन आपणांस विनंती करीत आहोत की, महाराष्ट्र पोलिस बांधव आपल्या राज्यात नैसर्गिक आपत्तीत, अतिरेकी कारवायांमध्ये आपली कर्तव्य, तत्परता मोठ्या हिमतीने बजावत आहेत.

पाहा व्हिडीओ -

गर्दीत वर्दी असते म्हणून प्रत्येक धर्माचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. सदरक्षणाय करुन खलनिग्रहणाय करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस बांधवांना आपल्या सणासुदीच्या काळात तरी आर्थिक समाधान द्यायला हवे.

माणूसकीची आणि कर्तव्य तत्परतेची भुमिका प्रामाणिकपणे बजावून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या महाराष्ट्र पोलिस बांधवांना दिवाळी बोनस देवून खऱ्या अर्थाने शुभेच्छा द्याव्यात अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

त्यामुळे मनसेच्या (MNS) पत्राचा विचार करुन राज्य शासन पोलिसांना बोनस देणारं का ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमधून भाजपने (BJP) माघार घेण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं होत. या पत्रानंतर भाजपने आपला उमेदवार देखील मागे घेतला होता. त्यामुळे या पत्राची दखल घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT