Anil Parab On Dapoli Sai Resort in Bombay High Court SAAM TV
मुंबई/पुणे

Anil Parab News: अनिल परबांना मोठा दिलासा; 21 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम, काय आहे प्रकरण?

साई रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुंबई हायकोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड

Anil Parab News: दोपालीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल परब यांना 21 जूनपर्यंत अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम राहणार आहे. यामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा कायम राहणार आहे. या प्रकरणात अनिल परब यांना 21 जूनपर्यंत अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम राहणार आहे.

ईडीनं साई रिसॉर्ट प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिल परबांचं नाव नाही. मात्र व्यवहाराची त्यांना पूर्ण कल्पना असल्याचा वारंवार उल्लेख आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी झाली.

नेमकं काय आहे प्रकरण?

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांचं नाव आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. याच प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात आरोपी म्हणून अनिल परब यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला होता.

मात्र, अनिल परब यांचा आरोपी म्हणून उल्लेख नसला तरी या आरोपपत्रात वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. तर अनिल परब यांच्यासाठी मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात अनिल परब यांना २१ जूनपर्यंत अटेकपासून संरक्षण मिळालं आहे . रम्यान, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणी जयराम देशपांडे आणि सदानंद कदम हे ईडीच्या अटकेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT