anil parab & kirit somaiya Saam TV
मुंबई/पुणे

"तो रिसॉर्ट माझा नाही, हिम्मत असेल तर पाडून दाखवा, सोमय्या पालिकेचे...."

कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपुर्वी चला अनिल परब यांचे रिसोर्ट तोडुया असे ट्विट केले होते. आज सोमय्या सकाळीच प्रतिकात्मक हातोड घेवून दापोलीकडे निघाले आहेत. त्यावर आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची प्रतिक्रिया आली आहे. हा रिसॉर्ट माझा नाही. ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पालिकेचे नोकर आहेत. किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत. जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत. त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे. मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे. कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार असल्याचं अनिल परब म्हणाले.

पुढे अनिल परब म्हणाले की बंगला तोडायला कर्मचारी आहेत का? हिंमत असेल तर तोडून दाखवा. ते फक्त नौटंकी करत आहेत. हे रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले आहे. हे कोण ठरवणार रिसॉर्ट बेकायदेशीर आहे ते? जर कुठल्या कायद्याचा भांग झालेला आहे तर संबधित विभाग कारवाई करेल. अनिल परब यांचे मुद्दाम नाव घेऊन वातवरण खराब करत आहेत. कोकणात ज्यांचे पाण्यात बंगले आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी. गावकऱ्यांचे म्हणणे आहे ते वातावरण खराब करत आहेत. ग्रामस्थांचा मला देखील फोन आला आम्ही विरोध करूपण मी म्हणालो तो तुमचा प्रश्न, जर त्यांच्या व्यवसायावर किरीट सोमय्या जात असतील तर ते विरोध करणारचं ना असेही परब म्हणाले.

दरम्यान अनिल परबांच्या बेकायदेशीर रिसॉर्टवर हातोडा घेऊन जात असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना दापोली पोलिसांनी थांबवले होते. कशेडी घाट उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आणि त्यांची गाडी थांबवली. त्यानंतर तेथे एकच गोंधळ माजला. यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना नोटिशीबाबत विचारणा केली असता, पोलिसांनी काहीही उत्तर दिलं नाही, फक्त तुम्ही नोटीस स्वीकारा असं ते म्हणाले. त्यावेळी संतप्त किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंचे पोलीसही उद्धट आहेत, असं ते म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटीजमध्ये किवी खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' फळ ठरेल फायदेशीर

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

Maharashtra News Live Update: 10 दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार - मंत्री दत्ता भरणे

SCROLL FOR NEXT