anil deshmukh, bombay high court, mlc election saam tv
मुंबई/पुणे

विधान परिषद निवडणूकीत मतदानाची संधी मिळावी; अनिल देशमुखांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

यापुर्वी राज्यसभेसाठी मतदान करता यावे यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला हाेता.

Siddharth Latkar

मुंबई (anil deshmukh latest marathi news) : विधान परिषदेच्या निवडणुकीत (mlc election) मतदानाची संधी मिळावी यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी आज (सोमवार) एक दिवसाच्या जातमुचलक्यावर सोडण्याची विनंती करणारा अंतरिम अर्ज मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) दाखल केला आहे. (anil deshmukh seeks for voting in mlc elections to bombay high court)

न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात देशमुख यांनी सकाळी ९ ते ६ या वेळेत विधानभवनात एस्कॉर्टमध्ये जाऊन मतदान करण्याची परवानगी मागितली आहे. दरम्यान न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या म्हणण्यानंतर येत्या बुधवारी देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी ठेवण्यात आली आहे.

गत आठवड्यातच विशेष पीएमएलए न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरती मुक्तता करण्याबाबत मागणी केली हाेती. संबंधित परवानगीचा अर्ज न्यायालयाने नाकारला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT