Anil Ambani ED probe  
मुंबई/पुणे

मोठी बातमी!अंबानी पुन्हा ईडीच्या रडारवर! ४० हजार कोटींचा बँक घोटाळा; २६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

Anil Ambani ED probe : अनिल अंबानी यांना कथित ₹४० हजार कोटी बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय कडून पुन्हा समन्स. २६ फेब्रुवारीला दिल्ली येथे चौकशी; आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Anil Ambani bank loan fraud investigation details : ४० हजार कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात उद्योगपती अनिल अंबानी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत. या प्रकरणात चौकशीसाठी २६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. (ED investigation process)

सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वीही अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ते निर्धारित दिवशी हजर राहिले नसल्याने ईडीने नव्याने समन्स जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर २६ फेब्रुवारीची चौकशी महत्त्वाची मानली जात आहे.

हे प्रकरण सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या वापराबाबत आणि निधीच्या कथित वळवणुकीबाबत तपास सुरू आहे. या आर्थिक व्यवहारांतून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्या अनुषंगाने ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) चौकशी सुरू केली आहे.

ईडीकडून संबंधित कागदपत्रे, आर्थिक देवाणघेवाण, कंपन्यांचे व्यवहार, तसेच कर्ज वितरण आणि परतफेडीच्या तपशिलांची छाननी केली जात आहे. आवश्यक असल्यास संबंधित अधिकारी आणि बँक प्रतिनिधींचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली असून, २६ फेब्रुवारी रोजी अनिल अंबानी ईडीसमोर हजर राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासानुसार अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips for Money: खिशात पैसा टिकत नाहीये? या वास्तू टीप्स तुमच्या येतील कामी

Rashmika-Vijay Wedding : लगीन घाई! रश्मिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचे घर पाहिलं का? विजय देवरकोंडाचा आलिशान बंगला सजला, VIDEO होतोय व्हायरल

Credit Card Rules: क्रेडिट कार्डच्या नियमात ५ मोठे बदल; १ एप्रिलपासून थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Rajpal Yadav : तुरूंगाबाहेर येताच राजपाल यादवची नको ती मागणी, मुख्यमंत्र्यांना भेटून सगळे काही सांगणार

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

SCROLL FOR NEXT