वीज कापल्याच्या रागातून महिलेनं कर्मचाऱ्यांनाचं चक्क डांबलं इंगळे चेतन
मुंबई/पुणे

वीज कापल्याच्या रागातून महिलेनं कर्मचाऱ्यांनाचं चक्क डांबलं

वीज मीटर कापल्याच्या रागातून एका महिलेने महावितरण कर्मचाऱ्यांवर दादागिरी करत त्यांना मीटररूम मध्येच लॉक करून डांबून ठेवल्याचा प्रकार विरार मध्ये घडला आहे.

चेतन इंगळे

चेतन इंगळे

विरार : वीज मीटर कापल्याच्या रागातून एका महिलेने महावितरण कर्मचाऱ्यांवर दादागिरी करत त्यांना मीटररूम मध्येच लॉक करून डांबून ठेवल्याचा प्रकार विरार मध्ये घडला आहे. Angered by the power cut the woman scolded the MSEB staff

विरार Virar पूर्वेच्या पाचपायरी परिसरातील गोविंद एकता या सोसायटीत महावितरणाचे कर्मचारी बिल न भरलेल्या मीटरवर कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांचा एका महिलेशी वाद झाला..

हे देखील पहा-

या महिलेने आपले थकीत वीजबील Electricity bill भरले असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तिचा वीजमीटर कापण्यास सुरुवात केली.. मग काय ? या महिलेचा संताप अनावर झाला व तिने चक्क मीटररूम Meter Room मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना आत डांबून ठेवून बाहेररून टाळे ठोकले आहे.

हे कर्मचारी लॉक Lock खोलण्यासाठी तिला बऱ्याच विनवण्या करीत होते.. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात Camera कैद झाला आहे. त्यानंतर सोसायटीच्या इतर रहिवाशांनी महिलेची समजूत घालून २०-२५ मिनिटांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. महिला व कर्मचाऱ्यांची समजूत घातल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. दरम्यान याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पारा ४२ अंशावर, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'

Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

१५ तरुणींवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून द्यायचा धमक्या, नराधमाच्या कृत्याने कोल्हापुरात खळबळ

Crime News: काका-पुतणीला रात्री एकाच खोलीत पकडले, सकाळी दोघे फरार; बापाने उचलले टोकाचे पाऊल

SCROLL FOR NEXT