anandacha siddha, maharashtra, maharashtra mantrimandal nirnay, cm eknath shinde saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Government : ठरलं तर ! सरकार पुन्हा देणार आनंदाचा शिधा, कधी व का ? वाचा सविस्तर

सन २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा जनतेला देण्यात आला हाेता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aanandacha Siddha : दिवाळी (diwali) प्रमाणेच राज्यातील (maharashtra) जनतेला शिंदे-फडणवीस सरकारने गुढीपाडवा (gudi padwa) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (dr babasaheb ambedkar jayanti) शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या बैठकीत (maharashtra mantrimandal nirnay toady) या निर्णायवर शिक्कामाेर्तब झाला. राज्यातील १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ होईल असे कळविण्यात आले आहे.

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद (aurangabad) व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.

गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. (Breaking Marathi News)

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सन २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Motorola Edge 70 : मोटोरोलाच्या फोनमध्ये आहेत ‘हे’ दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत किती?

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

प्रवाशांसाठी खुशखबर! कोकण अन् सिंधुदुर्गला ८ गाड्यांचा थांबा; कधीपासून होणार सुरूवात?

ONGC Recruitment: खुशखबर! ONGCमध्ये नोकरीची संधी; २६२३ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai Metro: मुंबईकारांसाठी गुड न्यूज! घाटकोपर- वर्सोवा मेट्रो होणार ६ डब्यांची, प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार; काय आहे प्लान?

SCROLL FOR NEXT