Amruta Fadnavis on Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Amruta Fadnavis on Ajit Pawar: अजित पवारांना उद्देशून अमृता फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाल्या, 'कोण कुठे डोळा मारतंय...'

Amruta Fadnavis: अमृता यांनी अजित पवार यांना उद्देशून एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Amruta Fadnavis on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमृता यांना गायनाची आवड असली तरी, त्या राजकीय विषयावर नेहमीच भाष्य करत असतात. आजही अमृता यांनी अजित पवार यांना उद्देशून एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

नुकतीच विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सकाळ माध्यम समूहाला 'दिलखुलास दादा' मुलाखत दिली. या मुलाखतीत २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर क्लेम २०२४ ला का? आताच करणार, असं सूचक विधान अजित पवारांनी केलं. (Breaking Marathi News)

अजित पवारांच्या (Ajit Pawar)  या विधानानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. शिवाय अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या देखील चर्चा रंगल्या. दरम्यान, याबाबत अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री खूप जवळची आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर उत्तर देताना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सूचक विधान केलं. 'ते त्या दोघांना जास्त माहिती आहे. राजकारणी लोक त्यांची मैत्री असते. अनेकदा डोळे मारतात खूप ठिकाणी डोळे मारतात.'कोण कुठे डोळे मारतंय ज्याचं त्यालाचं माहिती' असं विधान अमृता यांनी केलं. अजित पवारांना उद्देशून अमृता यांनी उद्देशून हे विधान केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी अजित पवारांनी डोळा मारला होता. तो व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी सारवासारव केली होती. अमृता फडणवीसांनी नेमका मुद्दा हेरत आज विधान केलंय.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: युरिया खतांसाठी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानादारांमध्ये वाद

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

Weekly Horoscope: या राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

भल्या पहाटे ८.२ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली, 'या' देशाला त्सुनामीचा इशारा

Period changes with age: २०, ३० आणि ४० नंतर मासिक पाळीच्या फ्लो होतो बदल, डॉक्टरांनी सांगितली प्रत्येक वयोगटातील महत्त्वाची कारणं

SCROLL FOR NEXT