Amit Shah  Amit Shah
मुंबई/पुणे

Amit Shah: अमित शहांच्या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतूकीत बदल, पुणेकरांनो घ्या नोंद

Amit Shah Balewadi event Pune police traffic advisory: केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाणेर भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.

Bhagyashree Kamble

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाणेर भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. वाहतूकीत बदल करण्यात येणार असल्यामुळे याची नोंद वाहनचालकांनी घ्यावी. तसेच वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त यांनी दिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी पुण्यात दाखल होणार आहेत. आज कोरेगाव पार्क येथे वेस्टिन हॉटेलमध्ये शहा मुक्कामी राहणार आहेत. आज अमित शहा एका कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील २० लाख लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी पत्र वाटप तसेच लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करणार आहेत.

नंतर शनिवारी अमित शहा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. शहा यांच्या दौऱ्यानिमित्त बाणेर भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. लष्कर भागातील रेसकोर्सजवळील पाण्याची टाकी परिसरात वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.

तसेच पाण्याची टाकी ते टर्फ क्लब रस्ता वाहतुकीस तात्पुरत्या स्वरुपात दुतर्फा करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT