Ambernath Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath: नालेसफाईची तक्रार केल्याचा राग, भाजपा पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

Ambernath Crime: अंबरनाथमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नालेसफाईबाबत तक्रार केल्याचा राग मनात ठेवत तिघांनी हे कृत्य केले.

Priya More

Summary -

  • अंबरनाथमध्ये नालेसफाई तक्रारीवरून भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण.

  • तक्रार का केली? असे म्हणत तीन जणांनी भररस्त्यात भाजप पदाधिकाऱ्याला केली मारहाण.

  • टी शर्ट फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

अजय दुधाणे, अंबरनाथ

नालेसफाईची तक्रार केल्याच्या रागातून अंबरनाथमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथच्या स्वामीनगरमध्ये ही घटना घडली. मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. तक्रार का केली? याचा जाब विचारत तिघांनी भाजप पदाधिकाऱ्याला सर्वांसमोर मारहाण केली. टी शर्ट फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.

अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात आली होती. मात्र ही नालेसफाई व्यवस्थित झाली नव्हती. त्यामुळे अजूनही या नाल्यात कचरा असल्याची तक्रार भाजपाचे अंबरनाथ पश्चिम सचिव श्रीनिवास आदीमूलम यांनी अंबरनाथ नगरपालिकेत केली होती. त्यांनी महापालिकेला तक्रारीसोबत फोटो देखील पाठवले होते. तसंच या नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नाल्याची व्यवस्थित सफाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

भाजप पदाधिकाऱ्याने तक्रार केल्याचा राग मनात धरून स्वामीनगर परिसरातील दोन ते तीन जणांनी मिळून त्यांना रात्रीच्या सुमारास बेदम मारहाण केली. या तिघांना नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तरी देखील सोडले नाही. टी शर्ट फाटेपर्यंत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्रीनिवास आदीमुलम यांनी केली आहे.

अंबरनाथमध्ये ही घटना कुठे घडली?

ही घटना अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरात घडली.

भाजप पदाधिकाऱ्याने कोणती तक्रार केली होती?

त्यांनी नालेसफाई नीट न झाल्याची तक्रार अंबरनाथ नगरपालिकेकडे केली होती.

या तक्रारीमुळे काय घडलं?

तक्रारीचा राग मनात धरून तिघांनी रात्री त्यांच्या बेदम मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT