Balaji kinikar Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath News: शिंदेंचा विश्वासू शिलेदार, ४ वेळा आमदार, बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट, शिवसेनेच्याच २ कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Ambernath Case: अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे.

Saam Tv

Ambernath: अंबरनाथमधील शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने शहरातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शिवाय शिवसेनेच्याच दोन कार्यकर्त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. असे असूनही मात्र अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील गटबाजीतून हा कट रचला गेला आहे. डॉ. बालाजी किणीकर हे अंबरनाथमधून चौथ्यांदा निवडून आले. अंबरनाथ शहरातील गटबाजीतून किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. एका कौटुंबिक लग्न सोहळ्याच्या निमित्ताने ते लातूरला गेले आहेत. या लग्नामध्ये २६ डिसेंबर रोजी हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आली. ही माहिती किणीकर यांनी मिळाली होती. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.

बालाजी किणीकर यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथमधून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय गुन्हे शाखेने शिवसेनेच्याच दोन कार्यकर्त्यांना समन्स बजावले असल्याची माहिती समोर आली आहे. बालाजी किणीकरांसह पोलिसांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. यात सध्या कोणताही गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही.

अंबरनाथ शहरात शिवसेनेमध्ये दोन गट आहेत. या दोन गटामध्ये संघर्ष आहे. गटांमधील गटबाजीच्या संघर्षातून हा हत्येचा कट रचला गेला अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास सुरू असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT