अंबरनाथ : बदलापुरातील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना अंबरनाथमधून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अंबरनाथमध्ये ३५ वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीला शौचालयात नेऊन विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथमध्येही एका ९ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय तरुणाने एका ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ शहरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्याचवेळी तरुणाने तिला गाठलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफित दाखवून विनयभंग केला.
दरम्यान, मुलीच्या आईने २१ ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बदलापुरात एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. घटनेच्या तीन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. सफाई कर्मचाऱ्याने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या आरोपी अक्षय शिंदे न्यायालयीन कोठडीत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ १६ ऑगस्ट रोजी बदलापुरातील नागरिकांना रेल्वे रोको आंदोलन केलं. या आंदोलकांनी तब्बल ९ तास रेल्वे रोखून ठेवली होती. सध्या या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरु आहे. तसेच या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होऊ लागल्या आहेत. राज्यात अल्पवयीन मुलीही अत्याचाराच्या बळी पडत आहेत. यामुळे कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या घटनांमुळे पोलिसांची जबाबदारी वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.