Ambernath Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Ambernath News : अंबरनाथ हादरलं! भररस्त्यात ६ वर्षीय चिमुकलीसोबत संतापजनक कृत्य; नराधमाला अटक

Ambernath Crime News : बदलापुरातील संतापजनक घटना ताजी असतानाच आता अंबरनाथमध्ये असाच काहीसा प्रकार घडलाय.

Satish Daud

अजय दुधाने, साम टीव्ही

राज्यात महिला तसेच अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आरोपीला तातडीने फासावर लटकवा अशी मागणी करत मोठं आंदोलनही करण्यात आलं.

बदलापुरातील ही संतापजनक घटना ताजी असतानाच आता अंबरनाथमध्ये असाच काहीसा प्रकार घडलाय. एका ६ वर्षीय चिमुकलीचा २३ वर्षीय नराधमाने भररस्त्यात विनयभंग (Crime) केला. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी आरोपीला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Police) विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. या नराधमाला बेड्या ठोकल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित ६ वर्षीय मुलगी अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते.

२३ वर्षीय आरोपी देखील याच परिसरात राहतो. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी रस्त्यावरून एकटी जात असल्याचं पाहून या नराधमाने तिला आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेली मुलगी रडू लागल्याने परिसरातील लोकांचं त्याकडे लक्ष गेलं.

यानंतर लोकांनी या नराधमाला पकडून त्याला बेदम चोप दिला आणि पोलिसांना पाचारण करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, अशी मागणी होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT