Ambernath Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath Crime: मुलीचा करत नव्हती नीट सांभाळ, पतीने रागाच्या भरात पत्नीची गळा चिरून केली हत्या

Ambernath News: मुलीचा नीट सांभाळ करत नसल्यानं पतीनेच पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची अंबरनाथमध्ये घडली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी ८ दिवसांत मार्ग काढत अखेर वाराणसीहून आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. मुलीचा नीट सांभाळ करत नसल्याने पत्नीशी वाद होऊन त्यातूनच पतीने पत्नीची हत्या केल्याचा उलगडा यानंतर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे आणि त्याची पत्नी रूपाली लोंढे हे एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होते. रूपाली ही मुलीचा सांभाळ नीट करत नसल्यामुळे विकी याचे तिच्याशी नेहमीच वाद होत होते.

त्यातच ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांच्यात पुन्हा वाद होऊन विकीने रूपालीचा पट्ट्याने गळा आवळला आणि धारदार चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली. यानंतर विकी हा थेट उत्तर प्रदेशात पळून गेला. त्याचा मार्ग काढत असतानाच तो उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख, भागवत सौंदाणे, कैलास पादीर हे तिघे तातडीने वाराणसीला रवाना झाले. तिथे स्थानिकांच्या वेशभूषेत सापळा रचून या तिघांनी विकीवर झडप घालत त्याला ताब्यात घेतलं.

तिथून त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणून गुरुवारी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT