Maharashtra Rain News Latest Update:  Saamtv
मुंबई/पुणे

Ambernath Rain News: वालधुनी नदीला पूर! अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी; भाविकांना दर्शन बंद

Maharashtra Rain News Latest Update: अंबरनाथमध्ये सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुूरूवात झाली असून वालधुनी नदीला पूर आला आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ, ता. २५ जुलै २०२४

आज मध्यरात्रीपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याणसह पुण्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अंबरनाथ शहरातही पावसाचा जोर वाढला असून प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं आहे.

अंबरनाथमध्ये सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुूरूवात झाली असून वालधुनी नदीला पूर आला आहे. तसोच शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गुडखाभर पाणी साचले असून गाभारा भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे.

दरवर्षी नदीला पाणी वाढल्यानंतर अशाप्रकारे गाभाऱ्यात पाणी शिरुन भोलेनाथाला जलाभिषेक घातला जातो. गाभाऱ्यातील भोलेनाथाचा मुखवटा बाहेर काढून ठेवण्यात आला आहे. या मुखवट्याचं दर्शन आणि पूजा सध्या भाविक करत आहेत. पाणी कमी होईपर्यंत कुणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही, असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान, उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूर मधील सखल भागात जमा होऊ लागल्या असून, बदलापूर मधील हेंद्रे पाडा येथे असलेल्या कृष्णा इस्टेट परिसरात गुडघाभर पाणी जमा झाले असून,तेथील लोकांना एक ते दीड फूट पाण्यातून जावे लागत आहे.

ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर येऊन बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT