Alibag Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Alibag Crime News : दोन्ही बहिणींना सुपमध्ये विष टाकून केली हत्या; मालमत्तेच्या हव्यासातून भावाचे कृत्य

Alibag News : दोन सख्ख्या बहिणींना सुपमध्ये विष टाकून केली हत्या; मालमत्तेच्या हव्यासातून भावाचे कृत्य

Rajesh Sonwane

सचिन कदम 
अलिबाग
: वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यानंतर अनुकंम्प तत्त्वावर नोकरी लागणार होती. शिवाय वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा वाट नको, सर्व संपत्ती आपल्यालाच मिळावी या हव्यासातून सख्ख्या भावाने दोघा बहिणींची हत्या (Crime News) केल्याची धक्कादायक घटना अलिबाग (Alibag) तालुक्यातील रेवदंडा येथुन समोर आली आहे. या घटनेने परिसर हादरला आहे. (Live Marathi News)

सोनाली मोहिते आणि स्नेहा मोहिते अशी मृत बहिणींची नावे आहेत. (Alibag Crime) त्यांचा भाऊ गणेश मोहिते याने सुपमध्ये उंदीर मारण्याचे विष टाकून ते प्यायला देऊन या दोन बहिणींची हत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे घडली होती. या दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरला होता. घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. या तपासात दुहेरी हत्याकांडाचे गुढ पोलिस तपासात उघड झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संमती पत्र न दिल्याने होता राग 

वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंप तत्वावर मुलाला नोकरी लागणार होती. यासाठी वारस असलेल्या दोन्ही बहिणींचे संमतीपत्र आवश्यक होते. मात्र बहिणी संमती पत्र देत नव्हत्या. याचा राग गणेशच्या मनात होता. शिवाय या दोघींना संपवले तर वडिलोपार्जित मालमत्ता आपल्यालाच मिळेल. या हव्यासापोटी गणेशने दोन बहीणींची सूपमध्ये विष टाकून हत्या केल्याची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर नवरदेव नववधू मतदानासाठी

Nagar Parishad Update : ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता; स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाबाबत ईव्हीएम हटाव सेनेचा संताप

Maharashtra Live News Update: प्रेम कुमार यांची बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड

Ranveer Singh: मी माफी मागतो...; 'कांतारा' च्या देवाला 'महिला भूत' म्हणल्याने रणवीर सिंह अडचणीत, स्पष्टीकरण देत म्हणाला...

मतमोजणीची अशी चूक पुन्हा नकोच, निवडणुकीसाठी गाईडलाईन्स करा, कोर्टाने आयोगाला सुनावले

SCROLL FOR NEXT