Akshay Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Akshay Shinde: अक्षय शिंदेची आत्महत्या नाही एन्काऊंटर, सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांचा गोळीबार; नेमकं काय घडलं? वाचा...

Badlapur Case: अक्षय शिंदे याने सोमवारी पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

Satish Kengar

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळ्या झाडात आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. मात्र आता एक नवीन माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याने आत्महत्या केली नसून पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा शिंदे याला पोलीस कोठडीत घेऊन जाण्यात येत होते.. त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर तळोजा कारागृहातून नेत असताना त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. याशिवाय आरोपी शिंदे याने आणखी दोन गोळ्या झाडल्या ज्या कोणालाही लागल्या नाहीत. यानंतर दुसऱ्या एका पोलिसाने स्वसंरक्षणार्थ बंदूक काढून अक्षय शिंदेवर गोळीबार केला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

अक्षयचा एन्काऊंटर संशयास्पद

अक्षयचा एन्काऊंटर संशयास्पद असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ म्हणाले आहेत. संजय शिरसाठ म्हणाले आहेत की, ''ही घटना मला पटत नाही आहे. एखाद्या आरोपाला घेऊन जाताना चार तरी पोलीस कर्मचारी सोबत असतात. तो इतका मोठा पैलवान नव्हता की, पोलिसांची बंदूक हसवून घेऊन गोळीबार करेल. कोणाकडून तरी हलगर्जीपणा झाला असेल.''

दरम्यान, 12 आणि 13 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील शाळेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे याच्यावर दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. पीडितेने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतरच ही बाब समोर आली. या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला होता. 17 ऑगस्ट रोजी अक्षय शिंदेला लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT