Akshay Shinde Encounter Case Update Saam TV
मुंबई/पुणे

Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

Akshay Shinde Encounter Case Update : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

Satish Daud

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. जोपर्यंत एसआयटी सविस्तर चौकशी करत नाहीत, तोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे. मुंबईतील घनश्याम उपाध्याय या वकिलांकडून ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

त्यामुळे सुप्रीम कोर्ट या याचिकेवर काय निर्णय देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने त्याची रवानगी तुरुंगात केली. पोलिसांकडून या घटनेचा सविस्तर तपास सुरु होता. सोमवारी २३ सप्टेंबर रोजी पोलीस अक्षय शिंदेला घेऊन बदलापूर येथे निघाले होते.

त्यावेळी आरोपी अक्षयने पोलिसाच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, विरोधकांनी पोलिसांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं असून इतर आरोपींना वाचवण्यासाठी आरोपीचा एन्काऊंटर केला का? असा सवाल उपस्थित केला आहे.

दुसरीकडे अक्षयच्या वडिलांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने यावर सुनावणी घेताना पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले आहे. व्हॅनमध्ये ४ पोलीस अधिकारी असताना देखील आरोपी इतका आक्रमक कसा होऊ शकतो. आरोपीने केलेली एक गोळी पोलिसाला लागली तर आणखी दोन गोळ्या कुठे गेल्या.

पोलिसांचे पिस्तूल लॉक नव्हतं का? असे विविध प्रश्न हायकोर्टाने विचारले. तसेच यासंदर्भात अहवाल सादर करण्याच्या देखील सूचना दिल्या. दरम्यान, हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टतही या एन्काऊंटर प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी देखील करण्यात आली. त्यामुळे पोलिसांचे पाय आणखीच खोलात जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT