Gopichand Padalkar Criticize Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

अजित पवारांच्या शब्दाला काडीची किंमत नाही - गोपीचंद पडळकर

एकदा एसटी व्यवस्थित चालू झाली की, मग त्यांच्यावर कारवाई करू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर चांगलंच निशाणा साधला आहे. एसटी सुरळीत चालू झाली का मग एसटी (ST) कर्माच्याऱ्यांवर कारवाई चालू करा हा सरकारचा दुतोंडीपणा आणि दुटप्पीपणा कामगाराच्या विरोधामधील सरकारची (government) भूमिका आज सभागृहामध्ये उघड करणार असे पडळकरांनी सांगितले आहे. त्रिसमितीय अहवाल आणि गोपनीयतेच्या पत्राची होळी केली असल्याचे पडळकरांनी यावेळी सांगितले आहे.

हे देखील पहा-

राज्य सरकारला (government) दोन्ही सभागृहात धारेवर धरणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर पडळकर आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हा असे सांगता आणि माधव काळे हा या प्रकरणातला सचिन वाझे आहेत तो गोपनीयतेचे पत्र पाठवतो हे अजित पवारांनी (Ajit Pawar) माहिती नाही का?',असा सवाल पडळकरांनी (Gopichand Padalkar) प्रश्न अपस्थित केला आहे. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एसटी कामगारांच्या संघटना होते. ज्या मान्यता प्राप्त संघटनेचे नेतृत्व पवार साहेब करत होते.

जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळते ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे असे पवार साहेबांचे भाषण आहे आणि त्यांच्या संघटनेचा मोर्चा होता. आता कर्मचारी त्यांच्यापासून बाजूला गेला आहे. न्यायालयाने मान्यता प्राप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची मान्यता रद्द केली. यामुळे पवारांची परिस्थिती अशी झाली आहे. त्यांना आता एसटी कर्मचाऱ्यांना काढून मग खाजगी भरती करायची आहे आणि यामध्ये घोटाळा करायचा आहे, असा गंभीर आरोप देखील गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पुढे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.

यावेळी पडळकर म्हणाले की, 'अजित पवारांच्या शब्दाला राज्यामध्ये काडीचीही किंमत राहिलेली नाही. याअगोदर विजेच्या प्रश्नावर सुद्धा अजित पवार मोठ्यामोठ्याने सभागृहात बोलले होते. मी सभागृहामध्ये बोलत असल्यापासून या राज्यातल्या एकाही शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केला जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी परत ऊर्जामंत्री सांगितलं बिल भरा नाहीतर कनेक्शन कट. यावरून कळत की अजित पवारांच्या शब्दाला काडीची किंमत राहिली की नाही. त्यामुळे त्यांनी आता मोठेपणा करणं बंद करावे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT