NCP Clashes Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit pawar vs Sharad Pawar : कोणाचं प्रतिज्ञापत्र खरं? सुनावणीत प्रतिज्ञापत्रांवरून दोन्ही गटात घमासान

NCP Clashes : निवडणूक आयोगासमोर आज झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांमध्ये प्रतिज्ञापत्रावरू खडाजंगी झाली. आमचीच प्रतिज्ञापत्र खरी आणि त्यांची खोटी, असे दावे-प्रतिदावे दोन्ही गटांकडून करण्यात आली. राष्ट्रवादीच्या सुनावणीत प्रतिज्ञापत्रच गेमचेंजर ठरणार का? आणि ठरलीच तर नेमकी खरी कुणाची आणि खोटी कुणाची? हा पेच सध्या कायम आहे.

Bharat Jadhav

(मयूर सावंत)

Ajit Pawar vs Sharad Pawar Group Hearing In Election Commission :

राष्ट्रवादीच्या सुनावणीत खोट्या प्रतिज्ञापत्रांवरून दोन्ही गटात घमासान झालं. खरी आणि खोटी प्रमाणपत्र कुणाची? यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी आमचंच प्रतिज्ञापत्र खरं आणि त्यांचं खोटं, असा आरोप-प्रत्यारोप दोन्ही गटाच्या वकिलांनी केला. त्यामुळं खरी प्रतिज्ञापत्र कुणाची? हा महत्त्वाचा मुद्दा निवडणूक आयोगासमोर ठेवण्यात आला. (Latest News)

आज पुन्हा निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत सुनावणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेतील बहुतांश पदाधिकारी तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुतांश सदस्य शरद पवार गटाच्या बाजूने आहेत. त्यामुळे पक्षावर शरद पवार गटाचाच हक्क आहे,’ असा युक्तिवाद या गटाकडून सोमवारी निवडणूक आयोगासमोर करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू झाला असून तो मंगळवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान गटाच्या वकिलांमध्ये प्रतिज्ञापत्रावरून घमासान झालं. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर अजित पवार गटाकडून मुकुल रोहतगी यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली.

आम्ही आयोगात सादर केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र खरे आहेत. समोरच्या गटाकडून खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेत, असा दावा शरद पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी केला. अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडल्यानंतर वकील मुकुल रोहतगी यांनी सिंघवी यांच्या आरोपांना धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी २४ प्रकारे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केलेत. पण आमचे प्रतिज्ञापत्र खरे आहेत. शरद पवार गटाच्या वतीनं खोटे शपथपत्र दाखल करण्यात आलेत.

दरम्यान रोहतगी यांनी आपण सादर केलेले प्रतिज्ञापत्र खरे असल्याचं म्हटलं. यावेळी मुकुल रोहतगी अजित पवार गटाचे खोटे प्रतिज्ञापत्राचे सॅम्पलही निवडणूक आयोगाला दाखवले. दोन्ही बाजूचे प्रतिज्ञापत्र चेक करा, अशी मागणी मुकुल रोहतगी यांनी केली. या वादामुळे राष्ट्रवादी पक्ष कोणाचा, हा पेच सध्या कायम आहे.

खोट्या प्रतिज्ञापत्रांवरून दोन्ही वकिलांनी, एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न केला. सुनावणी संपल्यानंतर खोट्या प्रतिज्ञापत्रांवर वकील देवदत्त कामत आणि जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलीये. अजित पवार गटाचे शपथपत्र खोटी आहेत, असं वक्तव्य शरद पवार गटाच्या नेत्यांनी केलं. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याला अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT