Ajit pawar kathewadi diwali padwa  Ajit pawar kathewadi diwali padwa
मुंबई/पुणे

Ajit Pawar : अजित पवारांचा काटेवाडीत जोरदार दिवाळी पाडवा, लोकांची गर्दी, व्हिडीओ पाहा

Ajit pawar kathewadi diwali padwa : अजित पवार यांचा काठेवाडी येथे दिवाळी पाडवा साजरा होत आहे. कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी रांगा लावल्यात.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar's Diwali Padwa : उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळी पाडव्याचा सण काठेवाडी येथे साजरा करत आहेत. ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबात दोन दिवाळी पाडव्याचे सण साजरे होत आहेत. शरद पवार यांचा गोविंदबाग येथे दिवाळी पाडवा साजरा होत आहे, तिथे ते कार्यकर्त्यांना भेटत आहेत. अजित पवार यांनी पहिल्यांदाच काठेवाडी येथे दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. सकाळी सात वाजता अजित पवार काठेवाडी येथे दिवाळी पाडव्यासाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसले. अजित पवार यांच्यासोबत पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ आणि जय हेही उपस्थित होते.

बारामतीतील काटेवाडी येथे अजित दादांना भेटण्यासाठी काठेवाडीमध्ये लोकांच्या रांगा लागल्या होत्या. यंदाच्या वर्षी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दिवाळी पाडवा सण काटेवाडी येथे साजरा करत आहेत. जनतेच्या शुभेच्छा काटेवाडी स्विकारत आहेत. अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी रांग लावण्यात आल्या आहेत.

अजित दादांचा कार्यकर्ता पोहोचला थेट सोन्याची मिठाई घेऊन.. अजित पवारांचे राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतर बारामतीमध्ये अजित पवार दिवाळी पाडवा साजरा करत आहेत. आज सकाळपासून आणि कार्यकर्ते पदाधिकारी अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी काटेवाडीत पोहोचले आहेत. अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या आबा काळे यांनी सर्वांचे लक्ष वेधळे. त्यांनी दादांसाठी स्पेशल बनवून सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई आणली. याची काठेवाडीत चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

Maharashtra News Live Update: पुमंत्रालयातील कॅन्टीनला क्लीनशीट कशी? संजय गायकवाडांचा संताप

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

SCROLL FOR NEXT