Ajit Pawar, Uddhav Thackeray, Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: अजित पवारांचा शिंदे गटाच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, पण ते म्हणाले...

Ajit Pawar On Maharashtra Political Crisis: माझा आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar : शिवसेनेत पडलेल्या फुटीबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे बंडाच्या तयारीत आहेत, याची पूर्वकल्पना उद्धव ठाकरे यांना आधीच दिली होती, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंना सावध केलं होतं. यासाठी पवार साहेबांनी त्यांना फोनही केला होता, असं अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी या मुद्द्यावर बैठकही घेतली होती. उद्धव ठाकरे यांना देखील सावध करण्यात आलं. मात्र माझा आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. पक्षांतर्गत मुद्दा आहे सर्वांशी चर्चा करेन, असं त्यांनी सांगितलं.

मात्र उद्धव ठाकरेंचा हाच विश्वास त्यांच्यासाठी घातक ठरला. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांशीही चर्चा केली होती. ते त्यांच्या परीने काम करत होते. दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही. कदाचित त्यांना कधी वाटलं नसेल की इतकी टोकाची भूमिका त्यांची सहकारी घेतील, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT