- अजित पवार
- अजित पवार - Saam TV
मुंबई/पुणे

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात अद्यापही बिकट परिस्थिती - अजित पवारांची माहिती

मंगेश कचरे

बारामती : ''कोल्हापूर Kolhapur, सांगली Sangli, सातारा Satara येथे पाण्याची परिस्थिती अजूनही बिकट आहे. माझे सकाळी मुख्यमंत्र्यांशी Chief Minister बोलणे झाले आहे. मी आज साताऱ्याला निघालो आहे. उद्या कोल्हापूर आणि सांगली दौराही करणार आहे,'' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी बारामतीमध्ये Baramati पत्रकारांशी बोलताना दिली. Ajit Pawar on western Maharashtra Tour Today

''पालकमंत्री जयंत पाटील, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी मी चर्चा केली. विभागीय आयुक्तांना सोबत घेवून त्या त्या जिल्ह्यात आढावा बैठक घेणार आहे. त्या त्या जिल्ह्यात काय आवश्यकता आहे याचा आम्ही आढावा घेणार. पाणी कमी होण्याच्या अनुषंगाने काय उपाययोजना करायच्या याबद्दल चर्चा करणार आहोत,'' असे त्यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार आज पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातल्या पूरस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, ''अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. अजूनही कोल्हापूर-पुणे रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इथल्याही पालकमंत्र्यांच्या मी संपर्कात आहे. तिथलाही आढावा घेत आहे. मुख्यमंत्री आज पूरग्रस्त भागात जात आहेत. या नैसर्गिक संकटात अडकलेल्या नागरीकांच्या पाठिशी सरकार उभे आहे. या सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची सरकारची भुमिका आहे. या पावसात दुर्दैवाने काही मृत्यू झाले. दरडी कोसळल्या. तिथे ढिगारे उपसण्याचे काम सुरु आहे. विजेच्या कामासाठी बारामती परिमंडलाची टिम मी तिकडे पाठवली आहे,'' Ajit Pawar on western Maharashtra Tour Today

''नवीन आजार उदभवू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. खाण्यापिण्याची गैरसोय होवू नये यासाठी मोफत शिवभोजन थाळी सुरु केली आहे. पूरग्रस्त व आपत्तीग्रस्तांना तांदूळ, दाळ आणि रॉकेल देत आहोत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याला प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अजूनही जी मदत लागेल ती मदत पोहोचवली जात आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना जिथल्या तिथे खरेदीची परवानगी दिलेली आहे. वेगवेगळी पथके मोठ्या प्रमाणात तैनात केली आहेत.वाई, पाटण तालुक्यात रस्ते सुस्थितीत नाहीत. महत्वाचे रस्ते सुरळीत करण्याचं काम सुरु आहे. आड बाजूचे रस्ते सुरळीत करण्याचाही आमचा प्रयत्न आहे. पाऊस कमी झाला आहे. मात्र पाण्याचा फुगवटा जास्त असल्यामुळे परिस्थिती बिकट आहे,'' असेही पवार यांनी सांगितले.

अलमट्टीबाबत विचारले असता पवार म्हणाले, "महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्याचे सरकार, मंत्री आणि अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. पाण्याच्या परिस्थितीबाबत समन्वय साधला जात आहे. कृष्णा आणि भीमा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आलं.

- हे पाणी पुढं जाताना उपनद्यांमध्ये ते पाणी गेलं. उजनी धरण मायनसमध्ये होतं ते आता २५% झालं आहे. ते आता ३०-३५ टक्के होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नीरा देवघर, भाटघर, गुंजवनी आणि वीर धरणाची परिस्थिती समाधानकारक. आहे. कालव्यात पाणी सोडले आहे, तलाव टप्प्याटप्प्याने सोडलं जात आहे. पाणी सोडताना ते दिवसाच सोडावं याबद्दल अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. पावसाच्या पाण्याचा धरणात येणारा साठा कसा आहे त्यावर हे अवलंबून आहे. जलसंपदा व इतर विभागाचे अधिकारी आणि आम्ही सर्वजण यावर बारकाईने लक्ष देत आहोत,''

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT