Maharashtra Cabinet expansion Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Cabinet Expansion : अजित पवार तडकाफडकी दिल्लीला, काहीतरी मोठं घडणार; आमदारांची धाकधूक वाढली

Maharashtra Cabinet expansion Latest News : विधानपरिषद निवडणुकीनंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळीच तडकाफडकी दिल्ली रवाना झाले आहेत.

Satish Daud

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळीच तडकाफडकी दिल्ली रवाना झाले आहेत. दिल्लीत गेल्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राज्यांतील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने भेट असण्याची शक्यता आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा केली जाणार, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या वाटेला किती मंत्रीपदं येणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांची आजची दिल्लीवारी त्याच अनुषंगाने असल्याचं सांगितलं जातंय. जर मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर अजित पवार गटाच्या वाटेला किती मंत्रीपदं मिळणार, हे देखील पाहण महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet expansion) होणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे भावी मंत्र्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. मंत्रिपदासाठी इच्छुकांनी लगबग देखील सुरू केली होती. मात्र, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

आता अधिवेशन संपले असून लवकरच महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यातील मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी अजित पवार यांनी तडकाफडकी दिल्ली दौरा केल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे अजितदादांच्या दिल्लीदौऱ्यात काय निर्णय होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कोणाला किती मिळणार मंत्रीपदे?

सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किमान दोन मंत्रीपदं हवी आहेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून देखील मंत्रि‍पदाची मागणी केली जात आहेत. शिवसेनेकडून संजय शिरसाठ आणि भरत गोगावले मंत्रि‍पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे येत्या काळात कुणाच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडणार, याकडे सर्वाचंच लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP आमदाराच्या नावाचं बनावट लेटरहेड; मंजूर कामाऐवजी काढला नव्या कामांचा GR, शिंदे सेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

SCROLL FOR NEXT