Devendra Fadnavis on Ajit Pawar Group Meets Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis Latest News: अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis on Ajit Pawar Group Meets Sharad Pawar: अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Satish Kengar

Devendra Fadnavis on Ajit Pawar Group Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीत मोठी फूट पडून सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाने आज शरद पवार यांची भेट घेतली आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे यांच्यसह इतर अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.

सोमवारपासून राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याआधी अजित पवार गटाने पवारांची घेतलेली ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे. अशातच या भेटीवर आता वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेते आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, "वर्षानुवर्षे शरद पवार हे त्यांचे नेते होते. त्यामुळे ते त्यांना भेटायला गेले असावेत, त्यात काही मोठे नाही."

शरद पवार यांच्या भेटीनंतर काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या वतीने माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत की, ''शरद पवार आमचे सर्वांचे आदरनीय नेते शरद पवार म्हणून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. वेळ न मागता आम्ही येथे आलो. आम्हाला समजलं होतं की ते येथे आहेत. त्यामुळे संधी साधून आम्ही सगळे येथे आलो. आम्ही पवार साहेबांकडे आशिर्वाद मागितले. पक्ष एकसंध कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी विचार करावा यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली आहे.''  (Latest Marathi News)

जयंत पाटील काय म्हणाले?

याबाबत माहिती देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ''उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काय रणनिती असावी यासाठी आमची बैठक सुरु होती. त्यावेळी मला अचानक सुप्रियाताईंचा फोन आला. त्यांनी मला तातडीने यशवंतराव चव्हाण सेंटरला बोलावलं. तेथे राष्ट्रवादीतून फुटलेले सर्व मंत्री आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि हे सर्व उपस्थित होते.''

ते म्हणाले, ''त्यांनी पवार साहेबांकडे झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. झालेल्या घटनेतून काहीतरी मार्ग तुम्ही काढा अशी विनंती त्यांनी पवार साहेबांना केली आहे. त्यावर शरद पवार साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे सर्व अचानक आणि अनपेक्षितपणे घटलं आहे. आम्ही सर्व एकत्र बसू आणि यावर चर्चा करुन निर्णय घेऊ.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT