ajit pawar big statement on sharad pawar and pm modi meeting Saam Tv
मुंबई/पुणे

पवार-मोदी भेटीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar On Modi-Pawar Meet: अजित पवार म्हणाले की, शरद पवार आणि पंतप्रधानांची जी भेट झाली त्यात पवारांनी महत्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले की, शरद पवार आणि पंतप्रधानांची जी भेट झाली त्यात पवारांनी महत्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे. ही भेट का घेतली याबाबत पवार साहेबांनी काल स्पष्ट केलं असं अजित पवार म्हणाले. (ajit pawar big statement on sharad pawar and pm modi meeting)

हे देखील पहा -

पुढे ते म्हणाले की, दोन वर्ष कोरोनात गेली त्यामुळे सरकारतं उत्पन्न कमी झालं, मात्र उत्पन्न कमी झालं त्यात सरकारचा दोष नसतो. आपण उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले. ३ कोटी २५ लाख उत्पन्न मिळवलं मागील वर्षी २ कोटी ६९ लाख मागच्या वर्षी होतं, ह्यात घबरण्यासारख नाही असं अजित पवार म्हणाले. किरीट सोमय्यांबद्दल बोलणं त्यांनी टाळलं, ते प्रकरण आता न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर बोलणं योग्य नाही असं अजित पवार म्हणाले. पवार-मोदी भेटीबाबत ते म्हणाले की, जे महत्वाचे मुद्दे होते त्यावर देशाच्या पंतप्रधांशी शरद पवार यांनी चर्चा केली आहे.

आमदार निधाच्या वाटपावरून ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे आमदारही म्हणतात आम्हाला निधी मिळत नाही, शिवसेना आणि कॉंग्रेसही अशीच तक्रार करत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. त्याचप्रमाणे कमी उत्पन्न येण्याचं एकमेव कारण म्हणजे कोरोना. यामुळे निधी कमी झाला आहे. मात्र तरीही स्थानिक विकास निधी कट लावला ना असंही अजित पवार म्हणाले. तसेच यंदा PWD ला राज्याच्या इतिहासात सर्वात जास्त म्हणजे २१ हजार कोटी विकास निधी दिला अशी माहीती त्यांनी दिली. बारा आमदाराच्या नियुक्तीबद्दल अजित पवार म्हणाले की, पवार साहेब सर्वोच्च नेत्यांना भेटले आता पाहूया काय होते. तसेत शरदराव पवार बोलल्यावर आम्ही छोटे कार्यकर्ते बोलणे योग्य नाही असं ते म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT