Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महायुतीत रस्सीखेच? सीएमपदावर अजितदादांचा दावा? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar News : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून सारंकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.

Tanmay Tillu

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही, असा मोठा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. मविआसारखं महायुतीतही मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून सारंकाही आलबेल नसल्याचं समोर आलंय. एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी हा दावा केलाय. बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करू असंही अजित पवारांनी नमूद केलंय.

प्रश्न- महायुतीचा सीएमपदाचा चेहरा ठरलेला आहे का?

अजित पवार- नाही. सर्वात आधी बहुमत मिळवण्याचं महायुतीचं ध्येय आहे. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत विचार करू. मात्र महायुतीचाच मुख्यमंत्री असणार.

शिंदे गटानं मात्र शिंदेंच्या नेतृत्त्वातच निवडणुकी लढवण्याची ठाम भूमिका मांडलीय. तसंच निकालानंतरही शिंदेंच नेतृत्व करणार असल्याचा दावा केलाय. फडणवीसांनीही शिंदे गटाच्या भूमिकेला पाठिंबा दिला असला तरी निकालानंतर कोण चेहरा असेल याचा निर्णय दिल्लीत होईल असं सांगून अजितदादांनाही दुजोरा दिलाय.

यामुळे मात्र मविआप्रमाणे महायुतीतही धुसफूस सुरू असल्याचं उघड झालंय. शिंदे आणि भाजपच्या भूमिकेनंतर अजित पवारांनीही सारवासारव करत शिंदेंच्याच नेतृत्त्वात निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. मात्र निकालनंतर पुढचा मुखमंत्री ठरणार हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

मविआत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आग्रह धरला होता. मात्र काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांची मागणी फेटाळून लावली, त्यामुळे मविआत सीएमपदाचा तिढा कायम आहे. मात्र आता अजित पवारांनी अचानक मोठा दावा केल्यामुळे मविआवर टीका करणा-या महायुतीतही सारंकाही आलबेल नसल्याचं पुढं आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

SCROLL FOR NEXT