Dhananjay Munde Speech Saam Tv
मुंबई/पुणे

Dhananjay Munde Speech : अजितदादांना २०२४ मध्ये मुख्यमंत्री बनवायचंय, धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादी युवा मेळाव्यात निश्चय

Dhananjay Munde in NCP Melava : अजितदादा आणि आम्हा सर्वांवर मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सोडणार नाही. आता ते जसे समोरून येतील तसे शिंगावर घ्यायची तयारी तुम्ही सर्वांनी ठेवा, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

प्रविण वाकचौरे

Pune NCP Melava :

आगमी निवडणुका महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं म्हटलं जात आहे. मात्र महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न कायम आहे. अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री बनवायचं असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्यांनी केला आहे. २०२४ मध्ये अजित पवारांना राज्याचा मुख्यमंत्री बनवायचं असं धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात म्हटलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा मिशन मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. अजितदादा आणि आम्हा सर्वांवर मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सोडणार नाही. आता ते जसे समोरून येतील तसे शिंगावर घ्यायची तयारी तुम्ही सर्वांनी ठेवा, असा इशारा धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना दिला आहे. अजित दादांनी आम्हाला उभं केलं. त्यांच्यामुळेच आम्ही आमदार झालो. आता सर्व पक्षाचा विचार केला तर सर्वात तरुण आमदार हे दादांनी निवडून आणलेत, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. (Political News)

अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन आपण हाती घेतलं आहे. २०२४ साली आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचं आहे, ते स्वप्न आपण बाळगलं आहे. त्यासाठी निवडणुकीत उभे राहणारे आणि पडद्यामागे असणाऱ्या सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी. तेव्हा २०२४ मध्ये अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

२ जुलैला आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला. त्यानंतर ५ जुलैच्या सभेला खऱ्या अर्थाने लोकशाही दिसली. ती लोकशाही आज ही इथे आहे. ६ फेब्रुवारीला त्या लोकशाहीचा विजय झाला. पक्ष आणि चिन्हही आपलं झालं. आता इथून पुढे फक्त अजित पर्व असणार. पुढची ५० वर्षे ही दादांचीच आहेत, असं धनंजय मुंडें यांना कार्यकर्त्यांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

Thane Tourism : शहराच्या गोंगाटापासून दूर निवांत ठिकाणी घालवा येणारा वीकेंड, बेस्ट लोकेशन आताच नोट करा

HBD Parineeti Chopra : राघव चड्ढाची 'परी' किती कोटींची मालकीण? आकडा वाचून डोळे फिरतील

Jio Recharge Offer: जिओचा नवीन पोस्टपेड प्लॅन धमाका! फक्त 'या' किमतीत ७५ जीबी डेटासह मिळवा प्रीमियम सुविधा

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

SCROLL FOR NEXT