Ajit Pawar PC  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : 'त्याविषयी मी काहीच बोलणार नाही', देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांनी बोलणं टाळलं

Ajit Pawar PC : देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी केलेल्या गौप्यस्फोटानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> गोपाल मोटघरे

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी केलेल्या गौप्यस्फोटानंतर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहाटेच्या शपथविधी विषयी जे गौप्यस्फोट करत आहेत, त्याविषयी मी काहीच बोलणार नाही' असे अजित पवार म्हणाले आहेत.

देवेद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबाबत प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 'मी तुम्हाला जवळपास दोन वर्षा आधी देखील हे सांगितलं होतं. त्यामुळे आता देखील मी त्या शपथविधीवर काही बोलणार नाही', अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

अनिल देखमुखांना भाजपचं येण्याचं आमिष?

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की ईडीची अटक टाळण्यााठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजपमद्ये येण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. याविषयी मी बोलण्यापेक्षा स्वतः अनिल देशमुखच माझ्यापेक्षा अधिक विश्वासहार्यतेने बोलू शकतील, असं देखील अजित पवार म्हणाले. (Latest Marathi News)

आव्हाड प्रकरणात कठोर कारवाईची मागणी

अजित पवार म्हणाले, ज्या लोकांनी जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याचा कट रचला होता त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. पोलीस खाते स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांनी देखील यात लक्ष घालून योग्य ती कारवाई केली केली पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT