Ajit Gavhane Join Ajit Pawar NCP Saam Tv News
मुंबई/पुणे

अजित पवारांचा काकांना धक्का, परतफेड करणार; बालेकिल्ल्यात पुन्हा ताकद वाढली, अजित गव्हाणेंची ३० नगरसेवकांसह घरवापसी

Ajit Gavhane Join Ajit Pawar NCP : गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्क्यावर धक्के दिले होते.

Prashant Patil

पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज १७ जून पिंपरी चिंचवडमध्ये येत असतानाच त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचं समोर आलं आहे. कारण भोसरी विधानसभेसाठी तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी घड्याळ हाती घेत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वार्थासाठी निघालेल्या गव्हाणेंची आम्ही पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. असा दावा आता शरद पवार गटाने केलाय. गव्हाणेंनी महापालिका निवडणुकीपूर्वी १५ ते १६ माजी नगरसेवक अजित पवारांच्या उपस्थितीत आज घड्याळ हाती घेणारे आहेत. आज शरद पवार पिंपरी चिंचवडमध्ये येणार असताना ही घडामोड घडतेय, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चेला उत आला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्क्यावर धक्के दिले होते. आता मात्र अजित पवार यांची परतफेड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कारण भोसरी विधानसभेसाठी तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी घड्याळ हाती घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेत गव्हाणे घरवापसी करणार असल्याचे पुढे आले आहे.गव्हाणे हे त्यांचे १५ ते १६ माजी नगरसेवक समर्थकांसह घड्याळ हाती घेणार आहेत. भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी गव्हाणेंनी तुतारी हाती घेणार असल्याचं पुढे आलं आहे.

सुधाकर बडगुजरांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटात असताना भाजपकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. सुधाकर बडगुजर आणि अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता यांचा एका पार्टीतील एकत्र डान्स करतानाचे फोटो समोर आले होते. भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यावेळी विधानसभेत हे फोटो दाखवत अख्खं सभागृह डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, अशी घोषणाही केली होती. मात्र, आता सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होताच भाजप नेत्यांची भाषा बदललेली दिसत आहे. आक्रमक शैलीत विरोधकांचे लचके तोडणाऱ्या नितेश राणे यांनीही सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेशाचं स्वागत केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता; खात्यात ₹३००० कधी येणार?

SCROLL FOR NEXT