Maharashtra Live News Update Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२५, मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Nanded:  नांदेडमध्ये नाल्यापलीकडे अडकलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना गावकऱ्यांनी काढले बाहेर

नांदेड -

नाल्यापलीकडे अडकलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना गावकऱ्यांनी काढले बाहेर.

देगलूर तालुक्यातील लखा गावातील प्रकार.

एका महिला शिक्षिकेची दुचाकी पुराच्या पाण्यातून गावकऱ्यांनी खांद्यावर उचलून केली नदीपार.

Nashik: नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

नाशिक-

अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने नाशिकच्या येवला शहर आणि तालुक्यातील काही भागात हजेरी

संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटसह पावसाने जोरदार हजेरी लावली

या पावसामुळे नवीन लागवड केलेल्या कांद्याला फायदा होणार आहे.

दरम्यान झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला

पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बामणी व दगडी नदीला पूर,

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परिसरात झालेल्या पावसामुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. या पूरस्थितीमुळे सातगाव डोंगरी येथील धरणात डोंगरमाथ्यावरून आलेल्या पाण्याचा मोठा विसर्ग गावातील शेतीचे नुकसान

सारथी विद्यार्थ्यांनी घेतली विखे पाटील यांची भेट

आंदोलन करून प्रश्न मिटत नाहीत

तुमच्या प्रश्नाबाबत पुनर्विचार करू

माझा विरोध नाही पी एच डी करायला

मात्र संख्या पी एच डी किती असावी हा विषय आहे.

नाशिक मुंबई महामार्गावर रायगडनगर जवळ खाजगी बसला भीषण अपघात

- अपघातात पंधरा ते वीस प्रवासी जखमी

- बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनावर पाठीमागून जाऊन धडकली

- अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात केले दाखल

- महामार्ग पोलिस व नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने केले मदत कार्य

वाशिम सह रिसोड,मालेगांव तालुक्याला पावसाने झोडपलं

वाशिम, रिसोड आणि मालेगांव शहरासह तालुक्यातील अनेक गावांना विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहेये.अगोदर अति पावसाने सोयाबीन,तूर,कपाशी या खरीप पिकांचे तसेच भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना आज त्यात पुनः या मुसळधार पावसाची भर पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. सकल भागात पाणीसुद्धा साचल आहे.

गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा देविदास गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बार्शी कोर्टाने दिला निर्णय, पूजा गायकवाडला आता जामीन करण्यासाठी चा मार्ग झाला मोकळा

पूजा गायकवाड हिला बार्शी कोर्टाने या अगोदर दिली होती पाच दिवसांची पोलीस कोठडी

पूजा गायकवाड हिला आज बार्शी कोर्टामध्ये हजर केल्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने दिला निर्णय

त्यामुळे पूजा गायकवाड आता जामीनासाठी केव्हा अर्ज करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

9 सप्टेंबर रोजी गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून केली होती आत्महत्या

Amravati : अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवरायांचा फोटो असलेल्या बॅनर वरून नागरिकांमध्ये संताप

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना फडणवीसांचा फोटो असलेले बॅनर झळकले नालीच्या काठावर

बॅनर कचऱ्याचे ढिगारे व नाल्याच्या कडेला लावले गेल्याने संताप.

लघुशंका होणाऱ्या ठिकाणी बॅनर लागल्याने शिवप्रेमींची तीव्र प्रतिक्रिया

शिवप्रेमींनी बॅनरवर आक्षेप नोंदवला

छत्रपतींचा अपमान करणारी कृती असल्याचा आरोप.

बॅनर तात्काळ काढण्याची मागणी

लावणाऱ्यांवर कडक कारवाईची जोरदार मागणी

Thane : ठाण्यातील मुंब्रा परिसरात नायजेरियन व्यक्तीचा धुमाकूळ

मुंब्र्यातील रेतीबंदर परिसरातील घरांमध्ये व घरातील परिसराच्या आवरत शिरत सामान्य नागरिकांना नायजेरियन व्यक्ती करायचा शिवीगाळ.

तर दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्ये देखील झोपत स्थानिक नागरिकांना दाखवायचा धाक.

स्थानिक नागरिकांनी नायजेरियन व्यक्तीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असता त्या नायजेरियन व्यक्तीने अनेकांवर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न केला.

अखेरीस स्थानिकांनी पोलिसांना कळवत त्या नायजेरियन व्यक्तीला हात पाय रशीच्या साह्याने बांधून केले पोलिसांच्या स्वाधीन.

Nanded : नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी महादेव समाजाचे आमरण उपोषण सुरू

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी महादेव समाजाने आजपासून आमरण उपोषण सुरू केलय.

आदिवासी प्रवर्गात नव्याने इतर जातींचा समावेश करू नये जर सरकारने असे षडयंत्र रचण्याचे काम केले तर ते षडयंत्र आम्ही हाणून पाडू असा इशारा कोळी महादेव जमातीच्या आंदोलकांनी दिलाय.

आपल्या या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोळी महादेव समाजाच्या वतीने हे उपोषण सुरू केलं आहे.

जिल्ह्याच्या विविध भागातून कोळी समाज या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Jalna : जालन्यातील बोडखा येथील नारोळा नदीला पूर

जालन्यातील घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय .

या पावसामुळे बोडखा गावातील नारोळा नदीला पूर आलाय.

याच पुराच्या पाण्यातून शालेय विद्यार्थिनींचा धोकादायक प्रवास सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

नारोळा नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.

Buldhana : शेळ्या चारणाऱ्या युवकाचा विद्युत वहिनीला धक्का लागून मृत्यू

विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील शेळ्या चालणाऱ्या युवकाचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अडवून धरला असून गेल्या दीड तासापासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. आज दुपारच्या सुमारास उच्च दाब विद्युत वाहिनीतील विद्युत प्रवाह झाडात उतरला व शेळी चालणाऱ्या युवकाला विद्युत धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. तर त्याला वाचवणाऱ्या दोन जण गंभीर जखमी झालेल्या आहेत. गंभीर जखमींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

Beed : बीड जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या साह्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू

बीड जिल्ह्यात मध्यरात्री ढगफुटीजन्य पाऊस झाला या पावसाचा फटका शेती पिकांसह शेतकऱ्यांवर झाल्याचे पाहायला मिळालं.

बीडच्या आष्टी येथील कडा व आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला.

या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळी झाल्याचे पाहायला मिळले

आष्टी मतदार संघातील कडा येथील पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचे हेलिकॉप्टरच्या साह्याने आमदार सुरेश धस यांच्या मागणीनंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आला आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

मात्र बीड जिल्ह्यामध्ये सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Banjara Reservation : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न दिल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाज आज बीडमध्ये रस्त्यावर उतरतला आहे. आमच्या मागण्या सरकारने तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही राज्यभर तसेच 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र आम्हाला एसटीतून आरक्षण न मिळाल्यास आम्ही हा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होऊ देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Sangali : सांगलीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

सांगली शहरासह परिसरामध्ये देखील आता मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते,मात्र दुपारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन पावसाला सुरुवात झाली होती.

दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून संततधार असा पाऊस पडत आहे त्यामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सांगलीसह मिरज शहर परिसरामध्ये देखील जोरदार असा पाऊस पडत आहे.

Pune : पुणे थेऊरमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे नायगाव रस्त्याचा संपर्क तुटला

मुसळधार पावसाने थेऊर परिसरातील रुके वस्ती या या ठिकाणाहून जाणारा नायगाव चा रस्ता पूर्ण खचला असून संपर्क तुटला आहे. सहा फूट रस्ता वाहून गेल्याने रस्त्यातून पाणी बाहेर काढण्यासाठी मोठा प्रयत्न नागरिकांनी केला. नायगाव ला जाणारा रस्ता पूर्ण उघडला आहे.

Buldhana : सिंदखेडराजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड, किनगावराजा सर्कल मधील अनेक गावात ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे. पाताळगंगा नदीला महापूर आला असून तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, शेतातील उभी पिके पाण्यात गेल्याने मोठ नुकसान झाले आहे.. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिसकाऊन घेतल्याने बळीराजा हवालदील झाला आहे.

Beed : बीड जिल्ह्यात धुवाधार पावसामुळे सीना नदीला पूर

बीड जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मात्र या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाला आहे. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील सीना नदीला पूर आल्याने पुरामध्ये एक व्यक्ती वाहून जाताना दिसत आहे.

Banjara Morcha : बंजारा समाजाच्या मोर्चाला मराठा समाजाचा पाठिंबा

मराठा समाजानंतर आज बंजारा समाज ही आक्रमक झाला होता आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मराठा समाज बांधवांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. स्वतः बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन मनोज जरांगे यांचे विश्वासू सहकारी गंगाधर काळकुटे यांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करावं व त्यांना एसटीत समाविष्ट करा व यासाठी आम्ही आज बंजारा समाजाला पाठिंबा दिल्याचं गंगाधर काळकुटे यांनी सांगितले.

Mumbai: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडले.

नागपुरात मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी साचलं

नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसाच्या सरीमुळे अनेक भागांत साचलं पाणी..

पाण्याचा निचरा न झाल्याने साचले पाणी...

शहरात अनेक भागातील रस्त्यावर पाणी, सिव्हिल लाईन परिसरात बाल भारतीच्या कार्यालयात समोर रस्त्यावर साचले पाणी...

दुचाकी धारकांना वाहन काढताना झाला त्रास...

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी छावा संघटनेचा रस्ता रोको आंदोलन

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम वितरित करा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने, लातूर सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. दरम्यान शासनाकडून मागण्या मान्य नाही झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे.

Jalna: जालन्यात बंजारा समाजाचा प्रचंड मोर्चा

बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी जालन्यामध्ये विराट मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते..हैदराबाद गॅझेट नुसार जीआर काढून एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला वेगळा न्याय का ?असा सवाल उपस्थित करत बंजारा समाज आणि आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

Ghatkopar: घाटकोपर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीची मृत्यूशी झुंज संपली

घाटकोपर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीची मृत्यूशी झुंज संपली

काल रात्री राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या भाविका हिरेन दामा आणि कोरम भानुशाली, अनिकेत बनसोडे यांना उद्या पर्यंत पोलीस कोठडी

गुन्ह्यातील कलमे वाढणार

अपघातग्रस्त मयताची अजून ही ओळख पटलेली नाही

जायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

पाणलोट क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे १८ दरवाजे एक फूटाने उघडण्यात आले असून, १८ हजार ८६४ क्युसेक पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.

यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Pune: बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरी पोलीस दाखल

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरी पोलिस दाखल

चौकशीसाठी पोलिस खेडकर याच्या घरी दाखल

बाणेर रस्त्यावरील खेडकर याच्या घरी पोलिस दाखल

पोलिसांना सहकार्य केलं नसल्याच्या प्रकरणी पोलिसांची नोटीस देण्यात आली होती.

खेडकर यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली आहे

यावेळी अधिकाऱ्याच्या अंगावर कुत्रे सोडलं पोलिसांनी घरावर नोटीस लावून सहकार्य केले नाही तर ताब्यात घेण्याची नोटीस दिली होती

Beed: बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका युवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे बीडच्या रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावा या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावरती डिझेल ओतून घेत आतमधून केले आहे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टाळला.

Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या विरोधात बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबद्दल आणि मराठा समाजातील मुलींबद्दल अपशब्द वापरले होते की ओबीसी समाजातील 11 मुलं मराठा समाजाच्या आकरा मुली सोबत लग्न करायला तयार आहेत तुम्ही आता क्षेत्रीय राहिला नाहीत आता पहिले अकरा विवाह लावा असे वक्तव्य केले होते ते वक्तव्य लक्ष्मण हाके यांना भाऊला असून आज बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज बांधवांनी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता.

Chhatrapati Sambhaji Nagar: सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीला पूर

संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. माणिकनगर,भवन,केऱ्हाळा, तांडाबाजार, पिंपळगाव पेठ या गावाहून वाहणाऱ्या पूर्णा नदीला घाटनांद्रा चारनेर परिसरात जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने या नदी दुधाडी वाहत आहेत.पिंपळगाव पेठ गणेशवाडीहून नदी पात्रातून जाण्यासाठी पुलचे काम गेल्या २० वर्षांपासून रखडल्याने पूर्णा नदीमुळे दरवर्षी पावसाळ्यात बोरगांव कासारी गावांचा संपर्क तुटला असून या ग्रामस्थांना बोरगांव कासारी हून निल्लोड मार्गे सिल्लोड येण्यासाठी जवळपास १८ ते २० कि.मी. जास्त अंतराचा फेरा मारावा लागत आहेत.

Badlapur: बदलापूर रेल्वे स्टेशनच्या पुढे मालगाडी थांबली; CSMT कडे जाणारी ट्रेन खोळंबली

बदलापूर रेल्वे स्टेशनच्या पुढे मालगाडी ट्रॅकवर थांबली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन खोळंबल्या आहेत. गेल्या दहा मिनिटांपासून लोकल ट्रेन थांबल्या आहेत. रेल्वेकडून अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

Jalna: जालन्यातील बंजारा समाजाच्या विराट मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी...

बंजारा समाजाच्या वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी....

जालन्यात बंजारा समाजाचा एसटी प्रवरातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी विराट मोर्चा....

हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी...

मोर्चामध्ये मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभूषामध्ये महिलांचा सहभाग....

Pooja Khedkar: पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली

पोलिसांना सहकार्य केलं नसल्याच्या प्रकरणी पोलिसांची नोटीस

खेडकर यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली आहे

यावेळी अधिकाऱ्याच्या अंगावर कुत्रे सोडलं पोलिसांनी घरावर नोटीस लावून सहकार्य केले नाही तर ताब्यात घेण्याची नोटीस दिली आहे.

Vasai-Virar: मीरा भाईंदरसह वसई-विरार शहरात पावसाची रिपरिप

अँकर : मीरा भाईंदर वसई-विरार शहरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे.

शहरात रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शहरात अनेक दिवसांपासून पावसाने शहरात उसंती घेतल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता.

मात्र, आज पडलेल्या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सध्या मीरा भाईंदरसह वसई-विरार परिसरात हलक्याफुलक्या सरींची रिपरिप सुरू आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nandurbar: आरक्षणाचा मुद्द्यावर आदिवासी समाज आक्रमक...

नंदुरबारमध्ये आदिवासींचे आरक्षण वाचवण्यासाठी धडगाव शहरात भव्य मोर्चाचे आयोजन...

आदिवासी संघटना आणि सर्वपक्षीय आदिवासी नेत्यांकडून एकदिवसीय आंदोलनाला सुरुवात....

आदिवासी समाजात धनगर आणि बंजारा समाजाचा घुसखोरी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाले असून घुसखोरी विरोधात आदिवासी समाजात संतापाची लाट...

Dhule: धुळ्यात बोगस मतदान झाल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा दावा

विधानसभा निवडणुकीत वोट चोरी संदर्भात धुळ्यात माजी आमदार अनिल गोटे यांचा 45 हजार बोगस मतदान झाल्याचा खळबळ जनक दावा

राहुल गांधी यांनी व्हॉट सॉरी संदर्भात एकाच घरात 80 कुटुंबीय राहत असल्याचा खुलासा केला परंतु धुळ्यात मात्र 195 कुटुंबीय एकाच घरात राहत असल्याचा गोटे यांनी केला खुलासा

राहुल गांधी यांनी केलेल्या खुलासा पेक्षा धुळ्यात झालेला खुलासा मोठा असल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा दावा

एकाच नावाचे खूप सारे मतदारांची नाव मतदार यादीत असल्याचा गोटे यांचा खुलासा

मतदार यंत्रणेमध्ये घोळ करण्यासाठी जोशी नामक इसमास दोन कोटी रुपयांचा पहिला हप्ता वाशी येथे देण्यात आल्याचा देखील गोटे यांचा खळबळ जनक दावा

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तीन महिन्यांच्या काळात 27 हजार बोगस मतदारांच्या नावाचा समावेश केल्याचा गोटे यांचा आरोप

Palghar: पालघरमध्ये पावसाची संततधार सुरु

पालघर जिल्ह्यात मागील दोन तासांपासून पावसाची संततधार सुरू . बोईसर , डहाणू , कासा , तलासरी परिसरात पावसाची संततधार . आज जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता . हवामान खात्याचा अंदाज . भात शेतीसाठी पूरक पाऊस असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त .

Maharashtra Live News Update: पुण्यात चांदीच्या दुकानावर दरोडा

पुण्यात चोरट्यांनी चांदीच्या दुकानावर दरोडा टाकलाय. 50 ते 60 किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली. पाच ते सहा लाख रोकडही घेऊन गेले. तीन चोरट्यांनी गुरुवार पेठेतील दुकानावर दरोडा टाकला. सीसीटीव्हीत पोत्यामध्ये चांदी घेऊन जाताना चोरटे दिसत आहेत.

Maharashtra Live News Update: देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ

गुजरातचे राज्यपाल देवव्रत यांनी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून आज शपथ घेतली. देवव्रत यांच्याकडे सध्या गुजरातची जबाबदारी आहे. आज त्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली

Maharashtra Live News Update:  पुणे–नाशिक महामार्गावर पाण्याखाली  

रात्रभर झालेल्या पावसामुळे पुणे–नाशिक महामार्गावर वाकी परिसरात पाणी साचले आहे. या पाण्यातून प्रवासी वाहनं, कामगारांची वाहतूक आणि अवजड गाड्यांचा प्रवास सुरूच आहे. मात्र, पाण्याचा वेग आणि खोली यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. धोकादायक परिस्थिती असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासात आपल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.

Maharashtra Live News Update:  बीड: बंजारा समाजाच्या मोर्चावर पावसाच सावट 

बीड जिल्ह्यामध्ये आज बंजारा समाज बांधवांचा विराट मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये लाखो बंजारा बांधव सहभागी होणार असून बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चाचे निवेदन शाळकरी मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Maharashtra Live News Update:  जालन्यात बंजारा समाजाच्या मोर्चाला थोड्याच वेळात होणार सुरुवात

हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्याव या मागणीसाठी जालन्यात आज बंजारा समाजाचा जन आक्रोश मोर्चा निघतोय.जालना शहरातील मस्तगड येथून मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून जालना शहरातील अंबड चौफुली येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. बंजारा समाजाला लवकरात लवकर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा बांधवांची आहे.

Maharashtra Live News Update:  पाथर्डीत ढगफुटी; अनेक गावांचा संपर्क तुटला, जनावरे वाहून गेली

पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री तीनच्या सुमारास पावसाने अचानक जोर धरला आणि विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक तास मुसळधार पाऊस कोसळत राहिला.

या अतिवृष्टीमुळे करंजी, मढीसह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांनी झाडांवर आसरा घेतला. जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Maharashtra Live News Update:  भिवंडीतील "रेनी कार्निवल" संवाद तरूणाईचा मोठ्या उत्साहात

शिव,बिरसा, फुले,शाहू,आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आजचे युवक, युवती एकत्र येऊन काम करणे खूप गरजेचे आहे. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना विचारमंच उपलब्ध करून देण्यासाठी समता संघर्ष संघटन व समता संघर्ष संघटन सांस्कृतिक मंच यांच्या वतीने शिव,बिरसा, फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेवर आधारीत विशेष युवकांसाठी "रेनी कार्निवल" संवाद तरूणाईचा या कार्यक्रम भिवंडी तालुक्यातील पडघा पाच्छापूर रोड येथे करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक उत्तम जोगदंड होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका, शिल्पा कांबळे यांनी तरुणांशी संवाद साधला. यावेळी अन्याय, विषमता , अंधश्रद्धा, गुलामगिरी, हुंडाबळी या पोस्टरांची जाळून होळी करण्यात आली असून एक आगळ्या, वेगळ्या पद्धतीने सामाजिक संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष म्हणजे अभिनव उपक्रम घेण्यात आला.त्यात तरुणांची "संसद सवांद" भरवण्यात आली असून त्यात तरुणांनी आपली मते मांडली. तर उठाव मंच यांचे कवी संमेलन पार पडले.तर यावेळी युवकांनी ,विद्यार्थ्यांनी, गाणी, अभिवाचन , कविता सादर केल्या. बदलापूर येथून आलेल्या टीम ने कथन अंधाराला भेदणारं हे नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे, उपाध्यक्ष सदानंद गायकवाड, संघटक

Maharashtra Live News Update:  खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार

सकाळी १० वाजता १४ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडल

मुठा नदीत पाणी सोडल्याने नदीच्या पात्रात वाढ

नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा

रविवार पासून धरणक्षेत्रात ही पावसाची संततधार सुरू आहे

Maharashtra Live News Update:  आज सकाळपासून मुंबई पूर्व उपनगरात पाऊस

मुंबई सह उपनगरामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे अशात मुंबईच्या पूर्व उपनगरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धुक पसरले आहे यामुळे यामुळे दृश्यमान देखील कमी झाले आहे याचा फटका रस्ते वाहतुकीला बसताना दिसत आहे यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी देखील आढळून येत आहे

Maharashtra Live News Update:  माजलगाव मध्ये ढगफुटी गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली. लेंडी नदीला पूर

बीड जिल्ह्यात मध्यरात्री ढगफुटीजन्य पाऊस झाला बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव धारूर वडवणी परळी या भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने माजलगाव मधील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून जनावरे व सुरक्षित जागीर जाण्याचा आव्हान जिल्हाधिकारी यांनी केले आहे जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांनी काळजी घ्यावी अशी आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .

भंडाऱ्यात मुसळधार पावसानं अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी

भंडाऱ्यात पहाटेपासून विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं सुमारे दोन तास हजेरी लावली. यामुळे भंडारा शहरातील शास्त्री चौक परिसरात सर्वत्र जलमयस्थिती निर्माण झाली असताना भंडारा शहरातील महिला समाज शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी शिरलं आहे. यामुळे या शाळेला सध्या तलावाचं स्वरूप आलं असून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही आता तारेवरची कसरत होणार आहे.

बीड: बंजारा समाज बांधवांचा आज विराट मोर्चा 

मराठा समाजानंतर आता बंजारा समाज हे आक्रमक झाला असून बंजारा समाजालाही हैदराबाद गॅजेट लागू करून एसटी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यामध्ये विराट मोर्चाचे आयोजन केला आहे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शाळकरी मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप होणार आहे मोर्चामध्ये 50 हजाराहून अधिक बंदरा समाज बांधव सहभाग नोंदवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुणेकरांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता

आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.

Mumbai : पूर्व द्रुत गती मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

आठवड्याचा पहिला दिवस नोकरदार वर्गांना ऑफिस गाठण्यासाठी लागत आहे विलंबन

ठाण्यातील तीन हात नका ते मुलुंड टोल नाका मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी चा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून संत गतीने वाहन रस्त्यावरती धावत आहे..

रस्त्यावरती पडलेले खड्डे ,अर्धवट सुरू असलेली कामे आणि सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी वरती फटका बसत आहे ...

याच वाहतूक कोंडीचा प्रश्न घेऊन आज मनसे रस्त्यावरती उतरणार आहे..

वाहतूक कोंडीबाबत वाहतूक विभागाला जाब विचारणार आहे.

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसलाय. रविवारच्या सुट्टीनंतर आज कामाच्या पहिल्याच दिवशी लोकल वाहतूक उशिराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांना लेटमार्कचा फटका बसणार आहे.

बीडच्या आष्टीत धुवाधार पाऊस, शेतकऱ्यांच्या शेतासह घरांमध्ये घुसले पाणी 

बीड जिल्ह्यात मध्ये रात्री धुवाधार पाऊस झाला बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटोदा आष्टी शिरूर या भागामध्ये पावसाने धोक्याची पातळी ओलांडली होती मध्यरात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी दिसत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या घरांमध्ये जनावरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरला आहे जनावरांसह झाडही वाहून गेले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी देवळाली दादेगाव या गावांचा संपर्क तुटला असून रस्त्यांवरही पाणी दिसत आहे शेतामध्ये तलावाचे स्वरूपाला असून तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी व शेतकऱ्यांची व्यथा सरकारने जाणून घ्यावी व तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा आज दिवसभर विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जलउपसा पंपांचा वीजपुरवठा शनिवारी रात्री आणि रविवारी जायकवाडी परिसरातील मुसळधार पावसामुळे खंडित झाला. यामुळे आज शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा रात्री 2 वाजता वीज गेली. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे जुने आणि नवीन पंपगृह ठप्प पडले. मुसळधार पावसामुळे दुरुस्तीचे काम लांबले. पहाटे 5 वाजता पाऊस कमी झाल्यानंतर जुने जायकवाडी पंपगृह येथील वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर 5:30 मिनिटांनी पाणीपुरवठा सुरू केला. पावसामुळे जायकवाडी पंपस्टेशन वीज यंत्रणा रात्रभर कोलमडली होती. याचा थेट परिणाम पाण्याच्या टप्प्यांवर झाला असून अनेक भागातील टप्पे पुढे ढकलण्यात आले आहे.

वाघाचा मृतदेह गेला वाहून

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील भीमणी नदी पात्रात वाघ मृतावस्थेत दिसून आला. मात्र वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाघाचा मृतदेह नदीच्या प्रवाहात वाहून गेला. सध्या वनविभागाने मृतदेह शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मागील काही दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पडल्याने सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतकरी व मजूर शेतातील कामे आटोपून परतत असताना त्यांना भीमणी नदीच्या पात्रात पाण्यावर वाघाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. मात्र पथक पोचेपर्यंत वाघाचा मृतदेह वाहून गेल्याने त्याची आता शोधाशोध सुरू आहे.

कळंब तालुक्यातील संजीतपुर येथील तेरणा नदीला पुर,गावाचा संपर्क तुटला

धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत असुन राञी झालेल्या पावसामुळे कळंब तालुक्यातील संजीतपुर येथील तेरणा नदीला पुर आला आहे.त्यामुळे संजीतपुर गावातील पुल पाण्याखाली गेला आहे.गावाला जा ये करण्यासाठी असलेला एकमेव पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला असुन परीसरातील सोयाबीन पीकाच मोठ नुकसान झाल आहे.सोयाबीन शेतात पाणी पाणी पाहायला मिळत आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यात जोरदार पाऊस

बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आला आहे. नगर बीड रस्त्यावरील धानोरा येथील कांबळी तलाव भरला असून पुलावरून पाणी सुरू आहे. बीड कडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील नद्यांना पूर आले आहेत. दौलवडगाव महसूल मंडळात आणि गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने नद्या वाहत्या झाल्या, उंदरखेल येथील प्रकल्प भरला आहे.देविनिमगावच्या नदीला पुर आला आहे. पुलावरून पाणी चालू आहे त्यामुळे देविनिमगाव धामणगाव रोड बंद झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेती पिकामध्ये तलावत स्वरूपाला आहे.

परभणीत पाऊसाचा कहर,   एका तासाच्या पावसाने परभणी शहरात पाणीच पाणी

परभणी जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे तर आज सकाळी एका तासाच्या पावसामुळे परभणी शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर एका तासाच्या पावसामुळे परभणी शहरातील रस्त्यांवर पाणी पाणी साचून रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी गेले आहे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आगरी कोळी समाज आता रस्त्यावर उतरणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दी बा पाटील यांचे नाव द्यावं यासाठी काल कार रॅली आयोजन करण्यात आलं होतं मात्र पंधरा दिवसांमध्ये नवी मुंबईचे विमानतळा बद्दल नोटिफिकेशन काढलं नाही तर मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर बंद पडू असा इशारा भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे

आगरी कोळी समाज दि बा पाटील यांच्या साठी आता रस्त्यावर उतरणार आहे दहा लाख समाज रस्त्यावर उतरण्याची आमची ताकद आहे हा समाज आक्रमक आहे याची जाणीव सरकारला हवी

Maharashtra Live News Update: मध्यरात्री ठाण्यात विचित्र अपघात, एकाचा मृत्यू

ठाण्यातील कॅडबरी जंक्शन जवळ पूर्व द्रुतगती महामार्गावर उभ्या असलेल्या वॉटर टँकर (MH 04 CU 7728) ला रिक्षाची जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या तीन व्यक्ती अडकल्या होत्या.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार कैलास पाटील यानी केली पाहणी

धाराशिव जिल्ह्यात गेली दोन दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे.या अतिवृष्टीमुळे कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळात शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे.या नुकसानीची धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह अनेकांच्या घराचे नुकसान झाल आहे त्यामुळे संसार उद्ध्वस्त झाले असुन शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना ठोस मदत द्यावी अशी मागणी कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

दुबईत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजयानंतर नागपूरकरांचा जल्लोष!

-दुबईत झालेल्या आशिया कपच्या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव करत विजय मिळवला.....

- नागपुरातील लक्ष्मी भवन चौकात क्रिकेट प्रेमी चाहत्यांनी एकत्र येत जल्लोष केला,

- भारतीय गोलंदाजांनी आज प्रचंड ताकद दाखवत पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि विजयाचा झेंडा फडकावला. या ऐतिहासिक विजयाची आनंदलहरी थेट नागपूरपर्यंत पोहोचली....‌‌

- धरमपेठ परिसरातील लक्ष्मी भवन चौकात युवकांनी जल्लोषात फटाके फोडले, तिरंगा लहरवला आणि "भारत माता की जय" तसेच "वंदे मातरम"च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.....

- चौकात दुमदुमणाऱ्या "जय श्रीराम"च्या घोषणा आणि देशभक्तीच्या गजराने वातावरण भारावून गेले.....

- युवकांनी राष्ट्रध्वज फडकवत, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या रोषणाईत भारताच्या विजयाचा उत्साहाने आनंद साजरा केला.....

- दुबईच्या मैदानावरील भारताचा हा विजय नागपूरच्या रस्त्यांवर उत्सवात रूपांतरित झाला.

सहस्त्रकुंड प्रकल्पाविरोधात 42 गावातील शेतकरी एकवटले

यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्यावर जलविद्युत प्रकल्पाला 42 गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चातारी येथे या प्रकल्पा विरोधात महा जनआक्रोश सभा घेण्यात आली. या सभेमध्ये हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा असा ठरावा एक मुखी घेण्यात आला सोबतच न्यायालयामध्ये याचिका टाकून या जलविद्युत प्रकल्पांमध्ये जवळपास 60 हजार हेक्टर वरील सुपीक शेत जमीन जाणार आहेत.हा प्रकल्प नेत्यांच्या आणि कंत्राटदारांचा फायद्याचा असल्याने यापुढे या प्रकल्पाला जे समर्थन देईल अशा राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला.

समुद्रकिनाऱ्यावर पर्यटांना गाडी नेण्यास बंदी ,हुल्लडबाजांविरुद्ध आता कारवाई सुरु

दापोली तालुक्यातील कर्दै समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी करताना थार गाडी उलटून अपघात झाल्याच्या घटनेची जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतली आहे तसेच हर्णे समुद्रकिनाऱ्यावर गाडी नेऊन पर्यटकांची हुल्लडबाजी सुरु होती असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर वाहनांना जाण्यास बंदी घातलीय . त्याची अंमलबजावणीही तातडीने करत समुद्रकिनाऱ्यावर जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत.अशा पर्यटकांवर पोलीसांकडून गुन्हे दाखल देखील केले जात आहेत.त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर गाडी नेऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना आता चाप बसणार आहे.

ताडगाव जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे देशविघातक कृत्य करत असतात. सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल माओवाद्यास काल दिनांक १३/०९/२०२५ रोजी गडचिरोली पोलीस दलाने ताब्यात घेवून त्याला अटक केली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवाद विरोधी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण १०९ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे..

दोन तासात हिंगोलीत दीड हजार हेक्टर शेती बाधित, शेतकरी साम टीव्हीवर ढसाढसा रडला

हिंगोलीच्या वसमत तालुक्यात काल दुपारी ढगफुटी झाली आहे, सलग दोन तासात पडलेल्या पावसामुळे 20 गावे बाधित झाली आहेत तर वसमत तालुक्यातील आरळ व तेलगाव शिवारात मागील 18 तासांपासून शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी अक्षरशा उध्वस्त झाले आहेत, वीस दिवसांपूर्वी पोळा सणाच्या पूर्वसंध्येला या शेतकऱ्यांच्या शेतातील मूग उडीत पावसामुळे नष्ट झाला तर आता दिवाळीच्या तोंडावर तोडणी ला आलेला सोयाबीन निसर्गाने वाहून नेले यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत, कापूस हळद या सह फळबागा देखील डोळ्याच्या पुढे पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिसत असल्याने आता आमच्यासमोर शासनाच्या नुकसान भरपाई शिवाय पर्याय नसल्याचं या भागातील शेतकरी सांगत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT