Eknath Shinde Latest News, Shivsena News, Ajay Choudhari News
Eknath Shinde Latest News, Shivsena News, Ajay Choudhari News  Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का; सेनेचे गटनेते अजय चौधरी राहणार!

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (Shivsena) विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मान्यता दिली आहे. विशेष बाब म्हणजे याच गटनेते पदावर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दावा केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेला हा दावा मान्य करण्यात आला नाही. (Eknath Shinde Latest News)

नियमानुसार आता शिवसेना गटनेता पदावर अजय चौधरी यांनाच मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची नोंद विधिमंडळात झाली असल्याचं समजतंय. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, गटनेतेपदी पक्षप्रमुख ज्यांची नेमणूक करतात. तिच नेमणूक ग्राह्य धरली जाते. त्यामुळे सुरूवातीला अजय चौधरी ही ग्राह्य धरण्यात आली. आता एकनाथ शिंदे यांनी कितीही दावे केले तर, शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी अजय चौधरीच राहणार आहे.(Ajay Choudhari News)

बंडखोरी केल्याच्या तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांसह विधानसभा उपाध्यक्ष आणि विधानसभेच्या सचिवांना पत्र पाठवलं होतं. आपण गटनेते असल्याचा दावा केला. तर भरतशेट गोगावले प्रतोद असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या या पत्रावर शिवसेनेच्या दोन तृतीअंश आमदारांच्या स्वाक्षऱ्या देखील होत्या. त्यामुळे शिवसेना गटनेतेपद शिवसेनेच्या हातातून जाणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली. अजय चौधरी यांच्या निवडीची घोषणा होताच शिवसेना प्रतोद सुनील प्रभू, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली होती. आज नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता शिंदे गट काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OLA Layoffs : 'ओला'मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; CEO बख्शींनी दिला ३ महिन्यात राजीनामा

Today's Marathi News Live : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा.

Kenya Dam Burst : केनियामध्ये मोठी दुर्घटना; धरण फुटल्याने ३५ जणांचा मृत्यू, रात्री गाढ झोपेतच नागरिक वाहून गेले

IMD Report: देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता; वाचा IMD रिपोर्ट

Shukra Gochar 2024: शुक्राच्या राशी बदलामुळे 'या' ३ राशी होणार धनवान

SCROLL FOR NEXT