BMC Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई महापालिकेचा प्रयोग! हवेच प्रदुशन थांबवायला गेले अन् ध्वनी प्रदूषण करुन बसले

हे दोन्ही हवा शुद्धीकरणाच्या मशीन पैकी एक मशीन आवाज करणारी असल्याने हवा शुद्धीकरण कदाचीत होईल, पण ही मशीन ध्वनी प्रदूषण करणारी ठरत आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महापालिका (BMC) मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर सध्या दोन खासगी कंपन्यांचे हवा शुद्धीकरणाचे मशीन गेल्या १५ दिवसापासून लावण्यात आले आहेत. प्रदूषित हवेचं शुद्धीकरण (Air Pollution) करण्यासाठी हे मशीन लावण्यात आलेत. दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी हे मशीन लावले असून मागील १५ दिवसात हवा शुद्ध करण्यासाठी या मशीन किती परिणामकारक ठरल्यात, किंवा हवेतील प्रदूषित घटक किती होते आणि ते कमी करण्यात किती यश आलं आहे, याचा अहवाल आता येणं बाकी आहे . हे दोन्ही हवा शुद्धीकरणाच्या मशीन पैकी एक मशीन आवाज करणारी असल्याने हवा शुद्धीकरण कदाचीत होईल, पण ही मशीन ध्वनी प्रदूषण करणारी ठरत आहे.

हे देखील पहा -

मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, हवेतील कार्बन डायॉक्साईड, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आठ ते बारा प्रदूषित तत्वे कमी करण्यास या मशीन प्रयत्न करत आहेत. या मशिनमधून प्रदूषित तत्वे शोधून घेत शुध्द हवा बाहेर सोडली जात आहे.

दोन दोन्ही मशीन बसवण्यापूर्वी संबंधित कंपनीने पंधरा दिवस आधी हवेतील घटकांचे मोजमाप केलं होतं . पण आता मागील पंधरा दिवसांतील हवेतील घटकांची नोंद घेतली गेली आहे, त्यानुसार हवेतील घटक कमी होऊन किती प्रमाणात हवा शुध्द झाली किंवा कसे, याचा अहवाल लवकरच प्रशासनाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे जर यामध्ये हवा शुध्दीकरणाचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचं दिसलं तर प्रशासन पुढील कार्यवाही करणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT