MIM corporator Sahar Shaikh remains untraceable amid fake document allegations and caste certificate controversy. saam tv
मुंबई/पुणे

'कैसा हराया...! MIM ची नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल, वडिलांचाही पत्ता लागेना

Sahar Shaikh Mumbra AIMIM: एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख फरार झाल्यात की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Bharat Jadhav

  • सहर शेख ‘नॉट रिचेबल’, संपर्क होत नाही

  • जात प्रमाणपत्र व बनावट कागदपत्रांचा आरोप

  • नगरसेविकेच्या पदावर धोका निर्माण

मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30मधून निवडून आल्यानंतर एमआयएमच्या उमेदवार सहर शेख आपल्या डॉयलॉगमुळे चर्चेत आल्या होत्या. पालिकेच्या निवडणुकीनंतर सहर शेख यांच्या कैसा हराया..., या डायलॉगची ठाणे, मुंबईसह राज्यभरात मोठी चर्चा रंगलेली होती. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरुन सहर शेख यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. त्यांचं नगरसेविकेचं पदही धोक्यात आलंय. शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाल्यापासून त्या गायब झाल्या आहेत. त्यांचा फोनही लागत नसल्यानं त्या सध्या नॉटरिचेबल आहेत.

इतकेच नाही तर त्यांचे वडीलसुद्धा नॉटरिचेबल आहेत. त्यांचाही फोन लागत नाहीये. दरम्यान बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहर शेख यांच्याविरुद्धात तक्रार दाखल करून त्यांची सखोल चौकशी करावी. फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा ,अशी तक्रारदाराची मागणी आहे. बनावट कागदपत्राचा प्रकरण समोर आल्यापासून सहर शेख आणि त्यांचे वडील मुंब्र्यातून गायब आहेत. सहर शेख मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून MIM पक्षाच्या नगरसेविका आहेत. मात्र त्या आणि त्यांचे वडील गेल्या काही दिवसांपासून मुंब्य्रात नसल्याची माहिती आहे.

कोणी केली तक्रार?

जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणी सहर शेख यांच्या परिवाराकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. दरम्यान सहर शेख यांच्या बनावट कागदपत्रांची तक्रार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी दिली आहे. तक्रार करणारी ⁠सिद्दीकी फराह शबाब अहमद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवार होती. सिद्दीकी फराह शबाब यांच्या तक्रारीवर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीची अहवाल लवकरच येणार आहे. त्याच दरम्यान सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस खान नॅाट रिचेबल झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी माध्यम प्रतिनिधींचे फोनदेखील घेत नाहीयेत.

फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सहर शेख व युनिस शेख हे दोन दिवसांपासून मुंब्र्यात नाही आहेत. सहर व युनिस यांचे जात प्रमाणपत्र बनावट व अवैध असल्याची ठाणे विभागीय कार्यालयाने माहिती दिल्यानंतर शेख यांच्याकडून कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाहीये. युनिस शेख आणि त्यांची मुलगी सहार शेख यांनी शासनाची दिशाभूल केल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करावा असे आदेश तहसीलदार उमेश पाटील यांनी काढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT