Ahmednagar Accident News  Saam Tv
मुंबई/पुणे

Ahmednagar Accident News: उसाने भरलेला ट्रक उलटला, एका महिलेचा जागीच मृत्यू

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. येथे श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावात उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे त्याखाली दबून रस्त्याच्या कडेने चाललेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन बनसोडे

अहमदनगरमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. येथे श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावात उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे त्याखाली दबून रस्त्याच्या कडेने चाललेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उसाने भरलेला ट्रक श्रीरामपूरकडून बाभळेश्वरच्या दिशेने चालला होता. मात्र खंडाळा गावात हा ट्रक उलटला. त्याचवेळी रस्त्याच्या कडेने जाणारी खंडाळा येथील रहिवासी उषाबाई विघावे ही महिला ट्रकमधील उसाखाली दबली गेली. ज्यात तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.  (Latest Marathi News)

तसेच मोटारसायकलवर जाणारे बेलापूर येथील दोघेजण जखमी झाले. वर्दळीच्या ठिकाणी अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत उसाखाली दबलेल्या मयत महिलेला तसेच दोन्ही जखमींना बाहेर काढले.

गावातील काही लोकांनी जेसीबी आणून ऊस बाजूला करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती तसेच कोल्हार येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक बाभळेश्वर मार्गे श्रीरामपूर अशी वळवण्यात आली आहे. त्यामुळे रहदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहतुकीच्या कोंडीत मोठी भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT