ahmednagar mahapalika, Ahmednagar To Mumbai Long March saam tv
मुंबई/पुणे

Ahmednagar To Mumbai Long March : आज ताेडगा निघणार? अहमदनगर महापालिका कर्मचारी लाँगमार्चवर ठाम

कामगारांच्या आक्रमकतेमुळे प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने महात्मा गांधी जयंती दिनापासून नगर ते मुंबई लाँगमार्च काढण्याचा इशारा दिला आहे. सामूहिक रजा टाकून लाँगमार्चमध्ये सहभागी होण्याचा कामगार संघटनेचा निर्धार आहे. (Maharashtra News)

महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे म्हणाले सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच सफाई कर्मचार्‍यांना वारसा हक्काचे नोकरीचे लाभ मिळावेत या मागण्यांसाठी नगर ते मंत्रालय असा लाँगमार्च काढण्यात येणार आहे. या लाँगमार्चला महात्मा गांधी जयंती दिनी (२ ऑक्टोबर) प्रारंभ हाेईल.

यासाठी सामूहिक रजा टाकून लाँगमार्चमध्ये सहभागी होण्याचा निर्धार कामगार संघटनेने केला आहे. हे आंदोलन टाळण्यासाठी महापालिका प्रशाससनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिले आहेत.

दरम्यान हे आंदोलन झाल्यास आंदाेलन काळात सुमारे १६ दिवस महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आंदाेलन हाेऊ नये यासाठी सरकारने देखील ठाेस पावलं उचलण्याची गरज आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Damage : किडनी खराब होण्याआधी त्वचेवर दिसतात 'हे' ५ संकेत, वेळीच व्हा सतर्क

Tenant Rights : घर सोडताना घरमालक डिपॉझिटमधून पेंटिंगचे पैसे कापतोय? जाणून घ्या काय सांगतो कायदा

Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! स्पर्धा परीक्षा अकॅडमीत ३ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाचं बिंग फुटलं

Woman Fitness Tips: पाठदुखी, थकवा आणि अशक्तपणा होईल दूर; महिलांनी रोजच्या सवयींमध्ये करा हे 8 बदल

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल, प्रतितोळा १२०० रूपयांनी भाव बदलला, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT