Ahmednagar News Saam Tv
मुंबई/पुणे

Ahmednagar News: अत्यंत दुर्दैवी! निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

Ahmednagar Akole Fofsandi News: अत्यंत दुर्दैवी! निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

Satish Kengar

>> सचिन बनसोडे

Ahmednagar Akole Fofsandi News:

अकोले तालुक्यातील फोफसंडी येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. संगमनेर तालुक्यातील कनोली येथील हे पर्यटक होते. अभिजीत वरपे व पंकज पाळंदे, असे बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी दोन ते अडीच वाजनेचे सुमारास हे चार पर्यटक मित्र फोफसंडी गावाजळ असणाऱ्या एका ओढ्यावर गेले होते. ते पाण्यात उतरले असता एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडू लागला. यातच दुसऱ्याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. पण यात दोघेही बुडाले.

सोबत आलेले दुसऱ्या दोन मित्रांनी गावात जाऊन ही माहिती गावकऱ्यांन दिली. त्यानंतर काही गावकरी या घटनास्थळी धावून आले आणि बुडालेले दोघांचा शोध सुरू केला. मात्र अद्याप त्यांचा मृतदेह सापडलेला नाही.  (Latest Marathi News)

पाणवठा येथे पाण्याची खोली जास्त असल्याने इथे गावकरी कधी जात नाही. दरम्यान, फोफसंडी हे अतिदुर्गम निसर्ग रम्य ठिकाण असल्याने या ठिकाणी राज्य भरातून अनेक पर्यटक येत असतात सध्या. अकोले तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने निसर्गाचे सौंदर्य व आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इकडे आकर्षित होत आहे.

नेटवर्क नसल्याने ही माहिती लवकर इतरांना समजली नाही. प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी शोध कार्य सुरू केलं आहे. याबाबत राजुर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे त्यांच्या सर्व टीम रवाना झाले आहेत. उशिरापर्यंत शोध सुरू असताना अंधार पडल्याने तसेच जोरदार पाऊस असल्याने तपास थांबण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT