Priyanka Chaturvedi On Sanjay Shirsat Saam Tv
मुंबई/पुणे

Priyanka Chaturvedi On Sanjay Shirsat: 'मी कशी दिसते आणि मी जिथे आहे, तिथे का आहे, हे गद्दारांनी सांगू नये', चतुर्वेदी यांचं शिरसाट यांना प्रत्युत्तर

Priyanka Chaturvedi News: 'मी कशी दिसते आणि मी जिथे आहे, तिथे का आहे, हे गद्दारांनी सांगू नये', चतुर्वेदी यांचं शिरसाट यांना प्रत्युत्तर

साम टिव्ही ब्युरो

Priyanka Chaturvedi On Sanjay Shirsat: ''आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून चतुर्वेदींना उमेदवारी दिली.'', असं वक्तव्य शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

चतुर्वेदी म्हणाल्या की, ''मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे, हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.''

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, ''संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहेत. ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात. यात आश्चर्य नाही की, भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे.'' (Latest Marathi News)

काय म्हणाले होते संजय शिरसाट?

संजय शिरसाट म्हणाले होते की, ''काल उद्धव ठाकरे यांची उत्तर भारतीयांची सभा झाली. या सभेत प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेवर भाषण करत होत्या. गद्दारांचं काहीतरी केलं पाहिजे, असं वाक्य त्यांच्या भाषणात होतं. कोण आहेत या चतुर्वेदी, त्यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी असं म्हटलं होतं.''

ते म्हणाले, ''आदित्य ठाकरे यांनी त्यांचं (प्रियांका चौतुर्वेदीं) सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. आधी त्या काँग्रेसमध्ये होत्या आणि आता त्या आम्हाला निष्ठेचे धडे देत आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

Sugar Vs Rocksugar: साखर आणि खडीसाखर, चहासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

SCROLL FOR NEXT