Jogeshwari News Saam Tv
मुंबई/पुणे

Jogeshwari News: रवींद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश! ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, फोटोला फासले काळे; पाहा VIDEO

Maharashtra Politics: वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची बातमी आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

साम टिव्ही ब्युरो

Ravindra Waikar News:

गेल्या दीड वर्षात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकामागून एक धक्के दिले आहेत. यातच आज उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची बातमी आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जोगेश्वरी मेघवाडी येथील शाखेवर असलेल्या बॅनरवरील वायकर यांच्या फोटोला काळे फासले आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात ठाकरे गटाचा एक कार्यकर्ता फोटोला काळे फासत असल्याचं दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. वायकर यांनी पक्ष सोडल्याने जोगेश्वरी येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष असल्याचं बोललं जात आहे. यातच आज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वायकर यांच्या फोटोला काळे फासले आहे. (Latest Marathi News)

म्हणून मी हा निर्णय घेतला, वायकर यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं कारण

दरम्यान शिंदे यांच्या शिवसेन्ट प्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकर म्हणाले आहेत की, ''गेली ५० वर्ष मी शिवसेनेत जे पडेल ते काम केलेल आहे. चार वेळा नगरसेवक, तीन वेळ आमदार हे पर्यायाने आले. ज्यावेळी मी आता पक्षप्रवेश करतोय, त्या मागचं कारण वेगळ आहे.''

वायकर पुढे म्हणाले, ''कोविडमध्ये कामे झाली नाहीत. पण आता आरेतील रस्त्यासाठी पैसे पाहिजेत. लोक रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी रडतायत. यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. धोरणात्मक निर्णय सत्तेत असल्याशिवाय सोडवाता येत नाहीत. लोक आपल्याला निवडून देतात. आपण काम केलं पाहिजे. सर्व विकासकामांची प्रश्न सोडवण्यासाठी मी इकडे आलोय. नाही सोडवले तर, मग मी लोकांना उत्तर देऊ शकणार नाही. यासाठीच मी इथे आलो आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

Abhijeet Dipke : सीजेपी पुन्हा सरकारविरोधात मोठं आंदोलन करणार; अभिजित दीपिकेंचा इशारा

मेथीच्या भाजीपासून बनवा कुरकुरीत भजी, चविष्ट आहे रेसिपी

Mukkam Post Pandharpur: श्रद्धा आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार; 'मुक्काम पोस्ट पंढरपूर' लवकरच रंगभूमीवर

SCROLL FOR NEXT