Kalyan Hoarding News : Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Hoarding News : मोठी बातमी! घाटकोपरनंतर कल्याणमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक वाहने दबली, थरारक VIDEO

kalyan hoarding collapse : घाटकोपरनंतर कल्याणमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेक वाहने दबली गेली.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपींवर कारवाई सुरु असताना आता कल्याणमध्येही होर्डिंग कोसळण्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये भल मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली अनेक वाहने दबले गेली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनास्थळी नागरिकांची एकाच धावाधाव झाली. या दुर्घटनेनंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायलं मिळालं.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये भला मोठा होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या सहजानंद चौकात हा होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटेत २ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. होर्डिंग थेट वाहनांवर कोसळल्याने अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच या घटनेनंतर वाहतूक कोंडी देखील झाली.

नेमकं काय घडलं?

कल्याण पश्चिममधील सहजानंद चौकात शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. रहदारीच्या या रस्त्यावर होर्डिंग कोसळल्याने वाहनचालकांना फटका बसला. या होर्डिंगजवळ रुग्णालयासहित अनेक दुकाने आहेत. रहदारीचा रस्ता असल्याने वाहनांची पार्किंगही घटनास्थळी होती.

होर्डिंग कोसळताना पार्किंगमध्ये काही गाड्या होत्या. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. होर्डिंग कोसळल्याने वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले. अनेकदा या नागरिकांनी होर्डिंगविषयी तक्रार केली होती. मात्र, महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Chip Cookies: लहान मुलांसाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी चॉकलेट चिप कुकीज, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माघ पौर्णिमा निमित्ताने पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा मंदिरात भाविकांची मांदियाळी

Chocolate Pudding Recipe : नो शुगर, नो बेकिंग; घरीच १० मिनिटांत बनवा चॉकलेट पुडिंग, बच्चे कंपनी होईल खुश

Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT