Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

'त्या' वादानंतर राष्ट्रवादीने शरद पवारांचा संपूर्ण व्हिडिओच केला ट्विट

खासदार शरद पवार यांचा साताऱ्यातील कार्यक्रमातील व्हिडिओ ट्विट करुन भाजने आरोप केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भाजपने (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे साताऱ्यातील सभेतील भाषण ट्विट करुन पवार यांच्यावर आरोप केले होते. यावरुन सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार नेमकं काय म्हटले हे सांगितले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांचा साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ ट्विट केला आहे.

'झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता.. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडिओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही..निदान पूर्ण व्हिडिओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती., असं ट्विट केलं आहे.

काय आहे कविता?

तुमचा दगड धोंडा आमही आमच्या छन्नी आणि हातोड्याने फोडतो. त्यातून तुमच्या घरात अन्न तयार करायला. पिठ तयार करायला जे लागतं ते आम्ही घडवतो. ज्या जात्यातून पिठ निघतं त्याने तुमचं पोट भरतं. आज आम्ही अनेक गोष्टी घडवल्या. आमच्या छनीने, हातोड्याने आणि घामाने, तुम्ही ज्यांची पूजा करता त्या ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या मूती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यांनो, तुम्ही आम्हाला त्या मंदिरात येऊ देत नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की, ब्रह्मा, विष्णू आणि महेश आम्ही आमच्या हाताने घडवला. हा तुमचा देव, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय सहन करणार नाही असं काव्य जवाहरनं लिहून ठेवल्याचं शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली. शरद पवार यांनी एका कवीची कवीता वाचून दाखवली आहे. तुम्ही ते सर्व भाषण ऐका, यात कवीचा दाखला दिला आहे. विरोधकांनी तेवढाच व्हिडिओ कट करुन पसरवला आहे, असल राजकारण का करत आहात, साहेबांनी एक उदाहरण खातर ते सांगितलं आहे.

भाजपने काय आरोप केला?

भाजपने (BJP) ट्विट करुन शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. 'नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा' असं ट्विटमध्ये म्हटले आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : कामात नवी संधी मिळेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sunday Horoscope: पैसा आणि नवी संधी, 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा रविवारच राशिभविष्य

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

SCROLL FOR NEXT