इंदिरा गांधींच नाव घ्यायला भय वाटते? की लाज वाटते की? - सामन्यातून भाजपवर हल्ला Saam TV
मुंबई/पुणे

इंदिरा गांधींच नाव घ्यायला भय वाटते? की लाज वाटते की? - सामन्यातून भाजपवर हल्ला

एखाद्या राज्यकर्त्यास मंदिरे बांधता येतील, नद्या साफ करता येतील, इमारती बांधता येतील, पण बांग्लादेश निर्माण करता येणार नाही अशी टीका सामन्यातून करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: १९७१ सालच्या भारत पाकिस्तान युद्धात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांग्लादेश (Bangladesh) या नव्या राष्ट्राला मान्यता दिली. या ऐतिहासिक विजय दिनानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमात केंद्र सरकार इंदिरा गांधींचे नाव देखील घेत नाही, "इंदिरा गांधींच नाव घ्यायला भय वाटते? की लाज वाटते की?" अशी टीका सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) केंद्र सरकारवर करण्यात आली आहे. (Afraid to name Indira Gandhi? Shame on you? - Attack on BJP in the saamana editorial)

हे देखील पहा -

सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे, अग्रलेखात म्हटलं गेलं की, "हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहाल तर पाकिस्तानचे केले तसे तुकडे तुकडे करू असा संदेश इंदिरा गांधींनी जगाला दिला. त्या विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना सध्याच्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचे साधे नावही घेऊ नये? इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते? इंदिरा गांधी यांनी 1971 चा पराक्रम केला तेव्हा आजचे दिल्लीतील राज्यकर्ते कदाचित गोधडीत रांगत असतील. राज्यकर्त्यांचे मन मोठेच हवे. संकुचित मनाच्या राजाकडून भव्य कामे होत नाहीत. एखाद्या राज्यकर्त्यास मंदिरे बांधता येतील, नद्या साफ करता येतील, इमारती बांधता येतील, पण बांग्लादेश निर्माण करता येणार नाही. इंदिरा गांधी यांनी जनरल सॅम माणेकशॉ यांना बोलावून पाकिस्तानात घुसण्याचे आदेश दिले. त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात चाललेल्या अत्याचाराचा परिणाम हिंदुस्थानच्या आर्थिक व्यवस्थेवर, सुव्यवस्थेवर होऊ लागला.

इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवायचे ठरविले व सर्जिकल स्ट्राईक वगैरे न करता सरळ हल्लाच केला. पाकिस्तानात सैन्यच घुसवले. हवाई हल्ले केले. नौदलाचा वापर केला. कराची बंदर बेचिराख केले. 16 डिसेंबर 1971 रोजी हिंदुस्थानी लष्करासमोर पाकिस्तानचे 90,000 सैन्य शरण आले. 1971 च्या युद्धातील (Indo-Pakistani War of 1971) हिंदुस्थानी सैन्याचा हा पराक्रम 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्या विजयामागची शक्ती इंदिरा गांधींची होती हे विसरून कसे चालेल? अशी टीका सामन्यातून करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT