मुंबई: शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेले अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratan Sadavarte) यांचं मुंबईतील घर अनधिकृत असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईच्या (Mumbai) हिंदमातामधील क्रिस्टल टॉवर (Crystal Tower) या 16 मजली इमारतीत सदावर्ते राहतात. मात्र या इमारतीला अजूनही मुंबई महापालिकेकडून (BMC) भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेने सदावर्तेंसह इमारतीतील सर्वांना नोटीस पाठवली आहे. (Adv Gunratan Sadavarte's Home in Mumbai is the found illegal)
हे देखील पाहा -
मुंबईच्या हिंदमाता येथील क्रिस्टल टॉवर या 16 मजली इमारतीला मुंबई महापालिकेकडून अजूनही भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेले नाही. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या घरासह सर्व रहिवाशांना अनधिकृत रहिवासी घोषित केले आहे. नियमाप्रमाणे इमारत प्रस्ताव विभागाकडून सर्वांना 353 (ए) अन्वये दोनदा नोटीस पाठवण्यात आली आहे .
हेल्थ सेंटरमध्ये सदावर्तेचे घर
गुणरत्न सदावर्ते राहत असलेल्या 16 व्या मजल्यावरील 1601 नंबरचे घर हे मूळ इमारत आराखड्यात फिटनेस सेंटर म्हणून दाखवण्यात आलेले आहे. मात्र, बिल्डरने त्यात बदल करून ते सदावर्ते यांना विकले. याबाबत सदावर्तेंना 347 (ए) नुसार अधिकृतपणे बदल केल्याचा ठपका ठेवत नोटीस बजावण्यात आली आहे. इमारतीमधील हे सर्वात मोठे अनधिकृत बांधकाम आहे. ते तोडत नाही तोपर्यंत इमारतीला ओसी मिळणार नाही, असेही इमारत प्रस्ताव विभागाने स्पष्ट केले.
सदावर्तेंच्या अडचणींत वाढ:
दरम्यान अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या अडणींत आणखीन वाढ झाली आहे. मुंबई, कोल्हापूर, बीड, सातारा, अकोला यानंतर आता सोलापूरातही गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. कलम १५३ अ ब, ५००,५०६,५०६,५०७ कलमानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी ही फिर्याद दिली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.