Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला शिंदे गट देणार उत्तर; शिंदे गटाचा ठरला प्लॅन

आदित्य ठाकरे यांनी राज्यात शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एका बाजूला शिंदे गट तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुळ शिवसेना असे दोन गट पडल्याचे दिसत आहेत. यामुळे आता आदित्य ठाकरे यांनी राज्यात शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमनातून ते राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटत आहेत. आता आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला शिंदे गट प्रत्युत्तर देणार आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचा महाराष्ट्र दौरा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शिंदे गटाचा प्लॅन ठरला आहे. लवकरच या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात शिंदे गट आदित्य ठाकरे यांना शह देणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. या दौऱ्यात शिंदे गटावर आदित्य ठाकरे टीका करत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे(ShivSena) ४० आमदार आहेत. राज्यभरात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी शिंदे गटाचा युवा सेना आता महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. काही दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. हे नवे पदाधिकारी महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

माजी मंत्री आदित्य ठाकरे राज्यभरात दौरे करुन शक्तीप्रदर्शन करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला राज्यभरात प्रतिसादही मिळत आहे. तर दुसरीकडे मनसेच्या अमित ठाकरे यांचाही महाराष्ट्र दौरा सुरू आहे. अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग दौरा केला होता. सध्या ते पालघर जिल्ह्याचा दौरा करत आहेत.

शिवसेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडे केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजप एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केले आहे, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जाची माहिती आता थेट SMSवर

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

SCROLL FOR NEXT