Aditya Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Aditya Thackeray Birthday : आदित्य ठाकरे... महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री; मुंबईत ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी

Political News : आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकलेले पाहायला मिळत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री  आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या दिवशी बॅनर लावू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. मात्र तरी देखील ठाकरे गटाकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकलेले पाहायला मिळत आहेत. युवासेनेचे मुंबई समन्वयक कार्तिक स्वामी यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेला बॅनर टिळकनगर परिसरात लावला आहे. (Latest Marath News)

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त लागलेल्या बॅनर्सवरही त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख करण्यात आला होता.

मुंबईचा विकासपुरुष

मुंबईतील वांद्रे परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईला जागतिक स्थान प्राप्त करुन देणारे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे मुंबईचा विकास पुरुष .... असं लिहून आदित्य ठाकरे यांनी मुंबईसाठी केलेल्या विकासकामांची लिस्ट बॅनरवर देण्यात आली आहे.

विकासकामांची यादी

कोस्टल रोड (मुंबई सागरी मार्ग), समुद्र किनाऱ्यावरील व्हिविंग डेक, इलेक्ट्रिक बेस्ट बसेस, इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस, मनपा शाळांचे मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रुपांतर, पूरमुक्त मुंबईसाठी विविध प्रकल्प, तिरुपती बालाजी मंदिरासाठी मुंबईत जमीन मंजूर अशी लिस्टच बॅनरवर दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naigaon BDD Project : 'बीडीडी'वासींच्या गृहप्रवेशाला मुहूर्त मिळाला, म्हाडाच्या घराच्या चाव्या या दिवशी मिळणार, वाचा...

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT